Gunratna Sadavarte : पवारांच्या निवासस्थानावर तुफान राडा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या सदावर्तेंच्या रिमांडमधील मुद्दे

आज सदावर्ते यांना किल्ला कोर्टात हजर केलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाकडून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या रिमांडमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले?

Gunratna Sadavarte : पवारांच्या निवासस्थानावर तुफान राडा, अॅड. गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी; जाणून घ्या सदावर्तेंच्या रिमांडमधील मुद्दे
गुणरत्न सदावर्तेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 7:53 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. आंदोलनावरील शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इतकंच नाही तर पवारांच्या निवासस्थानावर चप्पल आणि दगडही फेकले गेले. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या राड्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी रात्रीच सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आज सदावर्ते यांना किल्ला कोर्टात हजर केलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाकडून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या रिमांडमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले, पाहूया.

  1. नमुद आरोपीत आंदोलक एस. टी. कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री शरद पवार यांचे खाजगी निवासस्थानी प्रवेश करून चपला व दगडफेक करून, पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना धक्काबुक्की करुन, गंभीर जखमी करून, सरकारी कामात अटकाव करुन, बॅरिकेटस् तोडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असुन सदरच्या गुन्हयाचा सविस्तर तपास करणे आवश्यक आहे.
  2. सदरच्या गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेले आरोपीत इसम व महीला यांना फुस देण्याचे काम ज्या-ज्या इसमांनी केला आहे, त्यांच्याबाबत सविस्तर तपास करून त्यांना सदरच्या गुन्हयात अटक करणे आवश्यक असल्याने सदरच्या आरोपीतांची पोलिस कोठडी रिमांड मिळण्याची विनंती आहे.
  3. सदरच्या गुन्हयातील अटक आरोपीत आंदोलक यांना मोकळे सोडल्यास ते पुन्हा अशाच प्रकारचे कृत्य करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणण्याची शक्यता आहे
  4. सदरच्या गुन्हयातील अटक आरोपीतांकडे गुन्हयाबाबत सविस्तर व विस्तृतरित्या तपास करणे आवश्यक आहे. कारण सदरच्या गुन्हयामध्ये अधिक इसम सामिल असण्याची शक्यता आहे.
  5. सदरच्या गुन्हयातील आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचुन केला असल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसुन येत असुन सदरच्या कटामध्ये आणि कोणी सामिल आहेत किंवा कसे याबाबत तपास करणे आवश्यक आहे.
  6. सदर गुन्हयातील आरोपीतांचे मोबाईल फोन बाबत सविस्तर माहीती घेऊन सदरच्या गुन्हयाचा तपास करणे आवश्यक आहे, जेणेकरून सदरच्या कटामध्ये कोणकोणते आरोपींचा सहभाग आहे याबाबत तपास करण्याकरीता आरोपीतांची पोलिस कोठडी आवश्यक आहे.
  7. सदरच्या दाखल गुन्हयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा शोध घेऊन तपास करणे आवश्यक आहे.
  8. सदरच्या गुन्हयातील अटक आरोपीतांनी गुन्हयाच्या तपासामध्ये सहकार्य केले नसुन त्यांना जामिनावर मोडल्यास ते गुन्हयातील सामिल इतर आरोपीतांना पळवून लावण्याची शक्यता आहे.
  9. सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी हे महाराष्ट्रातील विविध भागातील राहणारे असुन, त्यांचा मुंबईमध्ये राहण्याचा कायमचा पत्ता नाही. त्यामुळे त्यांना जामिनावर मुक्त केल्यास ते तपासकामी अथवा न्यायालयीन कामकाजामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता फार कमी आहे.
  10. सदरच्या गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हयाच्या तपासामध्ये कोणतेही सहकार्य केले नाहीत, अथवा त्याचे पुर्णनांव, राहण्याचा पुर्ण पत्ता तसेच राहण्याचा पुरावा देण्यास नकार दिला आहे.
  11. सदरच्या गुन्हयातील आरोपीतांनी मद्यप्राशन केल्याची शंका असल्याने, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन, त्यांनी सहकार्य केले नसून संबंधीत वैद्यकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यात नकार दिला आहे.
  12. सदरच्या गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपीत हे आझाद मैदान येथुन घटनास्थळी आल्याची प्राथमिक माहीती मिळाली असुन, त्यांचे सर्व सामान त्याठिकाणी असुन, ते ताब्यात घेऊन तपास करणे आवश्यक आहे.
  13. तरी वर नमुद कारणाकरीता गुन्हयातील सर्व आरोपीतांचा सविस्तर तपास करणे आवश्यक असल्याने त्यांची चौदा दिवसांची पोलिस कोठडी मिळण्याची विनंती करण्यात आली होती.

इतर बातम्या : 

Gunratna Sadavarte: सदावर्तेंना पोलीस कोठडी का दिली?, वकील वासवानी यांनी सांगितलं कोर्टात काय घडलं?

Gunratna Sadavarte: दिलासा नाही! गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पवारांच्या घरासमोरील आंदोलन भोवलं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.