चोरी करून नातेवाईकांना खुश करायला गेला…नंतर सत्य बाहेर आल्यावर पोलिसही चक्रावले, प्रकरण नेमकं काय ?
संशयित आरोपी दत्घोता घोरपडे याला ठक्कर बाजार येथून अटक करण्यात आली आहे. त्याने तपासात तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून चोरीतून अजब प्रकार समोर आला आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना ( Bike Theft ) समोर येत आहे. अशातच नाशिक पोलीसांनी ( Nashik Police ) दुचाकी चोरीची घटना उघडकीस आणली आहे. नुकत्याच केलेल्या कारवाईत एकाला गजाआड केले आहे. त्यामध्ये चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. चोरी केलेली दुचाकी त्याने नातेवाईकांना गिफ्ट ( Gift ) केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्यात नातेवाईकांवरही कारवाईची तयारी केल्याने संशयित आरोपीने नातेवाईकांना दिलेले गिफ्ट रिटर्न करावे लागल्यानं जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या गुन्हे शाखेने नुकतीची एक कारवाई केली आहे. त्यामध्ये दुचाकी चोरीची घटना समोर आली आहे. त्यामध्ये दत्ता नरहरी घोरपडे असं सिडकोतील संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीकडून पोलीसांनी दीड लाखांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
याच दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. यामध्ये घोरपडे हा वापरासाठी नातेवाईकांकडून दुचाकी घेऊन येत होता. मात्र याचवेळी ती दुचाकी तो विकून पैसे घेत होता.
पण नातेवाइकांनी गाडी मागितली की दुसरीच गाडी नेऊन द्यायचा. नातेवाईकही कोणती तरी गाडी वापरायला मिळते ना म्हणून ते त्याकडे दुर्लक्ष करायचे. पण अचानक घोरपडे याला एका चोरीच्या गुन्ह्यात पकडण्यात आले.
घोरपडे याला ठक्कर बाजार येथून अटक करण्यात आली आहे. त्यावेळी त्याने नातेवाईकांना त्या दुचाकी दिल्याची कबुली दिली असून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुलीही घोरपडे याने पोलिसांना दिली आहे.
घोरपडे हा यापूर्वी गॅरेज मध्ये काम करत असल्याने नातेवाइकांनी विश्वास ठेवला. आणली असेल कुणाची गाडी म्हणून दुर्लक्ष केले. पण त्यांना आता मिळालेले रिटर्न गिफ्ट चर्चेचा विषय ठरत असून कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये तीन गुन्ह्यांची उकल झाली असून पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलीसांच्या ताब्यात संशयित दत्ता घोरपडे याला दिले आहे. त्यामुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात गेल्याकाही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये अशा अजब प्रकारच्या चोरीचा प्रकार समोर आल्याने चर्चेचा विषय ठरला असून नाशिक पोलीसांच्या कारवाई पुढील काळात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
त्यामुळे दुचाकी कुणी वापरण्यास देत असेल किंवा कुणाची घेण्याच्या विचार करत असेल तर काळजी घ्या अन्यथा पोलीसांच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल.