भांडणानंतर पत्नी माहेरी गेली, बहिणीकडे जेवून तो घरी गेला अन् उचललं टोकाचं पाऊल… ‘ते’ दृश्य पाहून आईने फोडला हंबरडा !

जोडप्याचे भांडण झाल्यानंतर रुसलेली पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. मात्र हे पाहून पती निराश झाला, त्याचा जगण्यातला रसच संपला अन् त्याने टोकाचं पाऊल उचललं. दुसऱ्या दिवशी त्याची आई घरी बोलवायला गेली असता...

भांडणानंतर पत्नी माहेरी गेली, बहिणीकडे जेवून तो घरी गेला अन् उचललं टोकाचं पाऊल... 'ते' दृश्य पाहून आईने फोडला हंबरडा !
पती-पत्नीच्या वादातून मेव्हण्याने भावोजीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 4:14 PM

जयपूर : पती-पत्नीमध्ये खटके नेहमीच उडत असतात, ही भांडणं (dispute) कोणालाच चुकली नाहीत. पण भांडणानंतर पत्नी रागावून माहेरी गेल्यामुळे एका तरूणाने असं टोकाचं पाऊल उचललं जे पाहून सर्वच हादरले. पत्नी माहेरी गेल्यामुळे तो युवक गप्प-गप्प झाला, त्याचा जीवनातला रसच संपून गेला आणि त्याने सरळ स्वत:च आयुष्यच संपवून (husband killed himself) टाकलं. राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलाचा निश्चल देह पाहून त्याच्या आईने काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. पोस्टमॉर्टम करून पोलिसांनी युवकाचा मृतदेह कुटुंबियांच्या हवाली केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हृदय पिळवटून टाकणारे प्रकरण निथौवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोदन येथील वेला गावातील आहे. या गावातील रहिवासी नारायण (वय 32) हा अहमदाबाद येथे मजुरीचे काम करायचा. चार दिवसांपूर्वीच तो अहमदाबादहून आपल्या घरी आला होता. मात्र घरी आल्यावर काही कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाले आणि रागावलेली पत्नी मुलाला घेऊन सरळ माहेरी निघून गेली. यामुळे नारायण एकदम गप्प झाला होता.

आईने दरवाजा उघडला आणि…

पत्नी माहेरी गेल्यावर नारायणच्या बहिणाने त्याला जेवण दिले. दोन घास कसेबसे पोटात ढकलून तो त्याच्या घरी जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई घरी गेली असता तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये गेल्यावर समोरचं दृश्य पाहून तिने हंबरडाच फोडला. तिच्या मुलाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

त्यानंतर नारायणच्या आईने आजूबाजूच्या लोकांना बोलावलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांनाकडे सुपूर्द करण्यात आला. नारायण आणि त्याच्या पत्नीच्या नात्याबाबत पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत असून ते या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.