पतीचा खून करून रात्रभर मृतदेहाजवळ बसून होती मुलीसह पत्नी; नेमकं काय घडलं?

पती बाहेर मजुरी करत होता. कधीकधी घरी येत होता. पती जुगार खेळत होता. तसेच तो दारु पित होता. गेल्या काही दिवसांपासून मारहाण करत होता.

पतीचा खून करून रात्रभर मृतदेहाजवळ बसून होती मुलीसह पत्नी; नेमकं काय घडलं?
Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 12:21 PM

झांसी : ही घटना आहे मउरानीपूर तहसीलमधील भदरवारा गावातील. येथे महिलेने आपल्या मुलीसोबत पतीला काठीने मारहाण केली. महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचा नवरा हा दारुच्या नशेत होता. मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. या वादात काठीने त्याला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. पण, महिलेच्या सासूने सुनेवर मुलाच्या खुनाचा आरोप लावला. पोलिसांनी आई-मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भदरवारा येथील रहिवासी काशीरामचे लग्न २००२ मध्ये झाले. दिल्लीत राहून तो मजुरी करत होता. आठ दिवसांपूर्वी तो घरी परत आला होता.

आठ दिवसांपूर्वी परत आला होता काशीराम

नर्मदा प्रसाद यांनी सांगितलं की, त्या त्यांच्या मुलाजवळ राहतात. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता त्यांना माहिती मिळाली की, काठीने मारहाण करण्यात येत आहे. मुलाच्या घरी गेली. सून आणि मुलामधील वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे कुणी ऐकले नाही. सुनेने काशीराम या त्यांच्या मुलाला दरवाजा बंद करून मारहाण केली. थोड्या वेळानंतर ती तिच्या घरी परतली.

सकाळी मुलाचा मृतदेह दिसला

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे पाच व वाजता काशीराम मृतवस्थेत दिसला. ही माहिती वाऱ्यासारखी आजूबाजूला पसरली. ही माहिती झाल्यानंतर परिसरातील लोकं आले. पोलीसही घटनास्थळी पोहचली. माझ्या मुलाची हत्या केल्याचा आरोप काशीरामच्या आईने केला. पोलिसांनी मृतकाची पत्नी खुशबूविरोधात गुन्हा दाखल केला.

पत्नीने सांगितलं…

पती बाहेर मजुरी करत होता. कधीकधी घरी येत होता. पती जुगार खेळत होता. तसेच तो दारु पित होता. गेल्या काही दिवसांपासून मारहाण करत होता. रात्री तो दारु पिऊन आला. मुलीची छेडखानी करू लागला. त्यामुळे त्याला विरोध केला. काठीने मारहाण केली असता तो ठार झाला. अशी माहिती मृतकाच्या पत्नीने दिली.

रात्रभर मृतदेहाशेजारी बसली आई-मुलगी

रात्री पती-पत्नीमध्ये मारहाण झाली. रात्री तिच्या नवऱ्याने प्राण सोडले. त्यानंतर ती महिला नवऱ्याच्या मृतदेहाशेजारी बसून रडत होती. सकाळी लोकं जमा झाले. दरवाजा उघडल्यानंतर काशीरामच्या मृत्यूची बातमी पसरली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.