मुलीसह प्रेयसीला सोडून तरुणाने केलं पलायन, मालवणी पोलिसांत तक्रार नाशकात गुन्हा दाखल
नाशिकच्या अंबड पोलीसांत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 31 वर्षीय मोजेस सोबत तिचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
नाशिक : नाशिकच्या मालवणी पोलिसांत एका पीडित महिलेने दिलेली तक्रार आणि त्यानंतर तो गुन्हा नाशिकच्या अंबड पोलिसांत वर्ग झाल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यात एका तरुणाने लहानग्या मुलीसह प्रेयसीला सोडून धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंध ठेवत रजिस्टर मॅरेज करण्याचे तरुणाने प्रेयसीला दाखविले होते. तरुणाने युवतीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिला गर्भवती केले होते. तीने मुलीला जन्म दिल्यानंतर दोघींनाही सोडून पळून गेल्याची बाब समोर आली आहे. यावरून नाशिकच्या अंबड पोलिसांत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.
नाशिकच्या अंबड पोलीसांत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार 31 वर्षीय मोजेस सोबत तिचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत.
त्यामध्ये मोजेस आणि पीडित महिला रजिस्टर मॅरेज करणार होते, त्यानुसार पीडित आणि मोजेस आठ महिन्यांपासून वास्तव्यास होते.
याच प्रेमसंबंधात मोजेस आणि पीडित महिला यांना तीन वर्षापूर्वी एक मुलगी झाली होती, त्यानुसार त्या मुलीला नातेवाईकांना त्या मुलीला दत्तक दिले होते.
वर्ष उलटत नाही तोच पीडित महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली होती, तीने दोन महिन्यापूर्वीच एका मुलीला जन्म दिला होता.
दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिल्यानंतर मोजेस यांच्या वागण्यात बदल झाल्याचे पीडित महिलेने सांगितले होते. त्यानंतर मुलीसह प्रेयसीला सोडून मोजेस याने पलायन केल्याचे महिलेने म्हंटले आहे.
संबंधित प्रकार पीडित महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात कथन केला होता, नातेवाईकांना घेऊन पीडित महिला मालवणी पोलिस ठाण्यात गेली होती.
हा संपूर्ण प्रकार नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अंबड पोलिसांत महिलेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.