डेटींग एपवर त्यांची ओळख झाली, रेस्टॉरंटमध्ये दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली, नंतर जे घडले ते भयंकर

28 जुलै रोजी रात्री 2.13 वाजता पोलिसांना एका जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्याची माहीती मिळाली. हा तरुण जबाब देण्याच्या अवस्थेत नव्हता.

डेटींग एपवर त्यांची ओळख झाली, रेस्टॉरंटमध्ये दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली, नंतर जे घडले ते भयंकर
cafeImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 2:13 PM

नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : एका 26 वर्षीय तरुणाची मोबाईल डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ते एका कॅफेत ते डेटवर गेले. तेथे त्या तरुणाचे बिलावरुन त्या तरुणीशी वाद होऊन दोघांनी एकमेकांच्या कानाखाली लगावली. त्यानंतर हॉटेलच्या बाऊन्सरनी त्या तरुणावर लैंगिक अत्याचार केला.  त्याचे अपहरण करण्यात येऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर एका रुग्णालयात त्या तरुणाला दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

एका डेटींग एपवर त्या दोघांची ओळख झाली. त्यानंतर पूर्व दिल्लीतील प्रीत विहार येथील कॅफेत त्या तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला नेले. तेथे त्यांनी वाईन घेतली. त्याचे बिल भरण्यावरुन त्यांचे एकमेकांशी वाद झाले. दोघांनी एकमेकांच्या कानाखाली मारली. त्यानंतर या तरुणाला रेस्टॉरंटच्या बाऊन्सरनी कारमधून मेरटपर्यंत नेऊन मारहाण केली, त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पैसे हिसकावून एका कॉलेजजवळ रस्त्यात फेकून दिले. त्यानंतर पिडीताने त्याच्या पालकांना कळविल्यानंतर कॅफेच्या मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बिल भरण्यावरुन भांडण झाले

28 जुलै रोजी रात्री 2.13 वाजता पोलिसांना एका जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केल्याची माहीती मिळाली. हा तरुण जबाब देण्याच्या अवस्थेत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या तरुणाने पोलिसांनी आपली व्यथा सांगितली. या तरुणाची डेटींग एपवर एका तरुणीशी ओळख झाली होती. दिल्लीतील विकास मार्ग येथील कॅफेत त्यांनी वाईन पिली. त्यानंतर 2,600 रुपयांचे बिल झाल्याने त्यांचे भांडण झाले. त्यानंतर कॅफेच्या बाऊन्सरनी त्याला मारहाण केली. त्याला गंगनगर येथून कारमध्ये घालून मेरठला नेले. त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार करुन त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला आणि तो डीलिट करण्याच्या बदल्यात पन्नास हजार रुपये मागण्यात आले. त्याकडील आठ हजार रुपये, कारच्या चाव्या आणि फोन हिसकावण्यात आल्याची फिर्याद नोंदविण्यात आल्याचे डीसीपी ( पूर्व ) अमृता गुगुलोथ यांनी सांगितले.

तरुण कॉर्पोरेट कार्यालयात कामाला

या तरुणाला शाहदरा येथील विवेक विहार येथील कॉलेजजवळ रस्त्यात टाकून देण्यात आले. तसेच या प्रकाराविषयी कोणालाही तक्रार करु नकोस अशी धमकी देण्यात आली. हा तरुण कॉर्पोरेट कार्यालयात कामाला असून त्याची डेटींग एपवर या तरुणीशी ओळख झाली. या तरुणीशी बिल भरण्यावरुन तरुणाचा वाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला मारहाण केली. या तरुणीचा या कॅफेच्या कर्मचाऱ्यांशी काही रॅकेट आहे का याचा तपास पोलिस आता करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम 308, 365, 394, 377, 506 आणि 34 अन्वये तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना अटक झाली आहे तर दोन महिलांची चौकशी सुरु आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.