Murder : त्याची किंकाळी कुणालाही ऐकू येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला! खळबळजनक हत्याकांड

पत्नीने मुलाच्या मदतीने केली पतीची हत्या! त्यानंतर आफताब पुनावाला जे श्रद्धासोबत केलं, इथंही तेच, 6 तुकडे!

Murder : त्याची किंकाळी कुणालाही ऐकू येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज वाढवला! खळबळजनक हत्याकांड
धक्कादायक घटना..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 11:42 AM

पश्चिम बंगाल : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रमाणेच (Shraddha Murder News) आणखी एक हत्याकांड उघडकीस आलंय. हा प्रकार घडलाय पश्चिम बंगाल (West Bengal Crime News) येथील बरुईपूर भागामध्ये. पत्नीनं आपल्या मुलासोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे सहा तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पण अखेर हे प्रकरण उघडकीस आलंय. 15 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या हत्याकांडप्रकरणी (Murder Mystery) आता महत्त्वाचे खुलासे समोर आलेत.

उज्ज्वल चक्रवर्ती असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही हत्या त्यांच्या बायको आणि मुलाने मिळून केली. समोर आलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल हे पत्नी आणि मुलाचा छळ करत होते. छोट्या मोठ्या कारणावरुन बायको मुलासोबत हिंसक वागणाऱ्या उज्ज्वल यांचा त्यांच्या पत्नी आणि मुलानेच काटा काढला.

गळा दाबून उज्ज्वल यांची हत्या करण्यात आली. यावेळी त्यांच्या किंकाळ्या कुणाला ऐकू येऊ नयेत म्हणून मुलाने टीव्हीचा आवाजही वाढवून ठेवला होता. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे 6 तुकडे करुन ते वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रमाणेच हेही हत्याकांड घडलं होतं.

उज्ज्वल चक्रवर्ती यांच्या मुलानेच वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांनी दिली होती. दरम्यान, मुलगा आणि पत्नी पहिल्यापासूनच पोलिसांच्या निशाण्यावर होते. त्यादरम्यान, पोलिसांनी उज्ज्वल यांच्या मृतदेहाचे तुकडेही शोधून काढले आणि पत्नीसह मुलालाही ताब्यात घेतलं.

मायलेकाची चौकशी केली असता पोलिसांसमोर संपूर्ण हत्यांकाडाचा उलगडा झाला. उज्ज्वल हा आपल्या पत्नीला आणि मुलाला वारंवार मारहाण करत होता. त्यांच्यात सारखी भांडणं होत होती.

शेजारच्यांना पहिल्यापासून हत्येची आशंका होता. अखेर 15 नोव्हेंबर रोजी उज्ज्वल बेपत्ता असल्याची पोलीस तक्रार दाखल झाली आणि तिथून हत्याकांडाच्या तपासाला सुरुवात झाली. उज्ज्वल चक्रवर्ती हे मार्जी सैनिक असल्याचीही माहिती समोर आलीय.

दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर पोलिसांना उज्ज्वल यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना फार वेळ लागला नाही.

गेल्या चार वर्षांपासून चक्रवर्ती कुटुंबात कहल सुरु होता. दररोज पतीपत्नी यांच्यात भांडणं व्हायची. दारु पिऊन येत उज्ज्वल पत्नीला छळत होता, असं शेजाऱ्यांनीही सांगितलंय. इतकंच नाही तर कधी कधी तर भर रस्त्यातही तो पत्नीवर हात उचलायचा.

10 वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झालेल्या उज्ज्वल चक्रवर्ती यांच्या वागणुकीने कुटुंबीय त्रस्त झाले होते. अखेर पत्नी आणि मुलानेच एक वेळ पाहून गळा दाबून उज्ज्वल यांची हत्या केली. हे हत्याकांड उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजलीय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.