घरात नवऱ्याने स्टॉक करुन ठेवलेली सगळी दारु बायकोने संपवली; रागाच्या भरात नवऱ्याने बायकोलाच संपवले पण शेवटी…
मृत महिलेने घरात ठेवलेली नवऱ्याची दारू प्यायली. यानंतर रागाच्या भरात पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला. या मृतदेहाचा बंदबोस्त करण्याच्या प्रयत्न असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
उन्नाव : नवरा बायकोमध्ये वेगवेगळ्या कारणांवरुन भांडण होतात. मात्र, उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) उन्नावमध्ये(Unnao) नवरा बायकोमध्ये विचित्र कारणावरुन वाद झाला आहे. घरात नवऱ्याने स्टॉक करुन ठेवलेली सगळी दारु(liquor) बायकोने संपवली. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात नवऱ्याने बायकोची हत्या(muder) केली. तो बायकोच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
उन्नाव मधील प्रेमनगर परिसरात हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे. मृत महिलेने घरात ठेवलेली नवऱ्याची दारू प्यायली. यानंतर रागाच्या भरात पतीने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला. या मृतदेहाचा बंदबोस्त करण्याच्या प्रयत्न असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. योगेंद्र तिवारी असे आरोपीचे नाव आहे.
योगेंद्र हा रिक्षा चालक आहे. प्रेमनगर येथील गौसिया मशिदीजवळ तो राहतो. पाच वर्षांपूर्वी त्याचा इंद्रनगर येथील रहिवासी घनश्याम गुप्ता यांची मुलगी पिंकी गुप्ता (30) हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. शुक्रवारी पिंकीने पतीने घरात ठेवलेली दारू प्यायली. रात्री उशिरा योगेंद्र घरी पोहोचला तेव्हा त्याला दारुच्या सर्व बॉटल रिकाम्या दिसल्या. मी सगळी दारु संपवल्याचे पिंकीने त्याला सांगितले. त्यानंतर त्याने रागाच्या भरातत पिंकीला बेदम मारहाण केली, त्याने पिंकीचे डोकं भिंतीवर आपटले. यात तिच्याच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिचा मृत्यू झाला आहे.
मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचे रात्रभर प्लानिंग केले
पिंकीची हत्या केल्यानंतर योगेंद्र रात्रभर नमृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचे रात्रभर प्लानिंग करत होता. त्याने रात्र मृतदेहासोबत काढली. सकाळ झाल्यावर त्याने रिक्षातून मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. तो पिंकीचा मृतदेह रिक्षाच ठेवत असताना शेजाऱ्यांनी त्याला पाहिलेआणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता योगेंद्रने पत्नीच्या हत्येची कबूली दिली. रागाच्या भरात मारहाण केल्याने पिंकीचा मृत्यू झाल्याचे योगेंद्रने पोलिसांनी सांगीतले. पिंकीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार योगेंद्र विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.