Video : पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्यानंतर, पोलिस बंदोबस्त वाढवला, मग…
मॅच जिंकल्यानंतर तरुणांनी दिल्या पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा, व्हिडीओ व्हायरल
बिहार : बिहार (Bihar) राज्यात एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video)झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी मॅच जिंकल्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. बिहारच्या भोजलपूर (Bhojalpur) जिल्ह्यात बॅडमिंटनची मॅच जिंकल्यानंतर हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तात्काळ तरुणांना ताब्यात घेतले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
भोजलपूरमधील चांदी नाका परिसरात हा प्रकार घडला आहे. काल रात्री नबरीपूरच्या इथे बॅडमिंटन मॅचची फायनल होती. ज्यावेळी मॅच जिंकली त्यावेळी काही तरुणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.
बिहार के आरा में ‘पाकिस्तान जिंदाबाद’ के नारे लगाते युवकों का वीडियो वायरल, पुलिस ने पांच को गिरफ्तार किया. pic.twitter.com/SpVI0s942L
— Asheesh Kumar Mishra (@Asheesh17604450) December 23, 2022
पोलिसांनी व्हिडीओचा आधार घेत तरुणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी अधिक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तरुणांच्या कुटुंबियांची आणि मित्र मंडळींची चौकशी करण्यात येणार आहे.