VIDEO : अहमदनगरमध्ये चोरट्यांची हिम्मत वाढली, बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपये लुटले, थरार सीसीटीव्हीत कैद

बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपये लूटल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. गोळीबार करत, बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग लंपास करण्यात आली आहे. अहमदनगरमधील नेवासा शहराजवळ ही घटना घडलीये. या घटनेचा थरार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

VIDEO : अहमदनगरमध्ये चोरट्यांची हिम्मत वाढली, बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपये लुटले, थरार सीसीटीव्हीत कैद
Newasa Robbery
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:52 PM

अहमदनगर : बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपये लूटल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. गोळीबार करत, बंदुकीचा धाक दाखवत 90 हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग लंपास करण्यात आली आहे. अहमदनगरमधील नेवासा शहराजवळ ही घटना घडलीये. या घटनेचा थरार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

नेमकं काय घडलं?

नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनीच्या मालकाचा मुलगा निरज मुथा शुक्रवारी (12 नोव्हेंबर) सायंकाळी पैशांची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घराच्या गेटजवळ आला. तेव्हा समोरच काट्यात लपून बसलेल्या‌ दोन चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर करत 90 हजार रुपयांची रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाले.

सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडालीये. मात्र, सुदैवाने गोळीबारात निरजला कुठलीही इजा झालेली नाही. सदर घटना कळताच पोलिसांनी तात्काळ‌ तपासाच्या दिशेने निर्णय घेत कर्मचाऱ्यांना सूचना करुन परिसरात नाकाबंदी केली. परंतु चोरटे सापडले नाहीत. सदरची घटना सिसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

चोरट्यांकडून गाडीच्या काचा फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

इगतपुरी तालुक्यातील भावली येथील धबधब्याजवळ एक फोटोग्राफर प्री-वेडिंग शूटसाठी आला होता. हा फोटोग्राफर मुंबई येथून आला होता. फोटोग्राफरने रस्त्याच्या कडेला त्याची शेवरलेट कंपनीची चारचाकी उभी केली होती. त्यानंतर तो धबधब्याजवळ प्री-वेडिंग शूटसाठी गेला. जेव्हा तो शूटवरुन परतला तेव्हा त्याला त्याच्या गाडीच्या काचा फुटलेल्या दिसल्या आणि आपल्या गाडीतील सामान चोरी झाल्याचं त्याला कळालं.

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारची दुपारी 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी काचा फोडून अडीच लाख रुपये किंमत असलेले कॅमेऱ्याच्या 3 लेन्स, बॅटरी, चार्जर इत्यादी साहित्य असलेली बॅग चोरुन नेली. शूटिंग आटपून आल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास इगतपुरी पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

कन्हानजवळ ट्रॅव्हल्सने बाईकला उडविले, घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

VIDEO | फोटोग्राफरला प्री-वेडिंग शूट पडले महागात, चोरट्यांकडून गाडीच्या काचा फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.