CRIME STRORY : एसटी स्टॅंडशेजारी लॉजवर राहायचे, चोऱ्या करायचे, त्यांच्याकडे अशा गोष्टी सापडल्या की पोलिसांना घाम फुटला
लबर नसरूद्दीन शेख, जॉनी मकवा, शोएब उंबर शेख, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे, माळीवाडा बसस्थानक परिसरातून अनेक मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.
अहमदनगर : अहमदनगरला शहरातील लॉजवर (Ahmadnagar city lodge) राहून बस स्थानक परिसरात (St Stand Area) प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीचा कोतवाली पोलिसांनी केला पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 500 रूपये किमतीचे आठ मोबाइल पोलिसांनी (Ahmadnagar police) ताब्यात घेतले आहेत. चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. खबऱ्याकडून ज्यावेळी पोलिसांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांच्याकडून काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.
दिलबर नसरूद्दीन शेख, जॉनी मकवा, शोएब उंबर शेख, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे, माळीवाडा बसस्थानक परिसरातून अनेक मोबाइल चोरीला गेल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत.
पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत चोरट्यांची माहिती काढली. मोबाइल चोरी करणारी परराज्यातील टोळी पंचपीर चावडी येथील लॉजवर राहत असल्याची माहिती तपासात उघड झाली.
पोलिसांच्या पथकाने लॉजवर जाऊन खात्री केली असता परराज्यातील काही व्यक्ती राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील आठ मोबाइलही ताब्यात घेत ते कुठून चोरले असल्याची विचारणा केली असता त्यांनी ते बस स्थानक परिसरातून चोरले असल्याची कबूली दिली.
त्यांच्यासोबत आणखी काही चोरटे असण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची कसून चौकशी करीत आहेत.