Ahmadnagar Crime : गंभीर गुन्ह्यातील चार कैद्यांचे कारागृहातून पलायन, गज तोडून कैदी फरार, पोलिस दलात खळबळ

संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कारागृहातून चार कैदी फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गज तोडून हे कैदी पळून गेल्यान एकच खळबळ माजली आहे.

Ahmadnagar Crime :  गंभीर गुन्ह्यातील चार कैद्यांचे कारागृहातून पलायन, गज तोडून कैदी फरार, पोलिस दलात खळबळ
चार खतरनाक कैद्यांचे पलायन Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 12:04 PM

मनोज गाडेकर टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 8 नोव्हेंबर 2023 : अहमदनगरमधून गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.

या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. कारागृहातून कैदी पळाल्याने संगमनेर जेल प्रशासनाची लाज मात्र चव्हाट्यावर आली आहे कापले आणि ते फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. या कारागृहामध्ये तीन बराकी आहेत. या जेलमध्ये २४ कैद्यांची क्षमता असतानाही अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त कैदी या जेलमध्ये ठेवलेले असतात. त्या कारागृहामध्ये काल रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. मात्र असे असतानाही चार कैद्यांनी जेलचे गज कापले आणि ते फरार झाले.राहुल देविदास काळे दाखल गुन्हे (भादवि कलम 302 , 307), रोशन रमेश ददेल (भादवि कलम 376), अनिल छबू ढोले (भादवि कलम 376) आणि मच्छिंद्र मनाजी जाधव (भादवि कलम 307) अशी या चार गुन्हेगारांची नावे आहेत.

अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या आरोपींनी जेलमधून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष व्हावे यासाठी जेलमध्ये मोठ मोठ्याने गाणे तसेच आरत्या सुरू होत्या. या गोंधळात या चौघांनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच त्यांना पळू जाण्यासाठी कोणी मदत केली, साहित्य कोणी पुरवले याचाही पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.