विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने जे केलं त्यामुळे…

ही तरूणी काही काळापूर्वी तिच्या माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी रात्री ती घराबाहेर एका तरूणाशी बोलत उभी होती. मात्र ते पाहून तिचा काका संतापला. त्यानंतर थेट...

विवाहीत पुतणी दुसऱ्या तरूणाशी बोलताना दिसली, त्यानंतर काकाने जे केलं त्यामुळे...
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 2:49 PM

अहमदनगर | 19 ऑक्टोबर 2023 : अहमदनगरच्या (ahmadnagr) कोपरगाव येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेथे एका विवाही तरूणीची तिच्या काकानेच हत्या (crime news) केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. माहेरी आलेली ही तरूणी घराबाहेर एका मुलाशी बोलत होती, हे पाहून काका संतापला आणि त्याच भरात त्याने हे कृत्य केल्याचमे समजते. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपी काकाला ताब्यात घेत अटक केली आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारासा घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण गाव हादरलं. मृत तरूणीच्या आईने पोलिसांत धाव घेत रडतरडत सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर कोपरगाव शहर पोलीसांनी आरोपीच्या संतोष आरणे ( वय २६) मुसक्या आवळल्या. त्याची पुढील चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागात हा दुर्दैवी प्रकार घडला. तेथे बुधवारी रात्री १२ च्या सुमारास काकाने हल्ला केल्या ज्यामध्ये पुतणीचा मृत्यू झाला. मृत मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यांच्या सांगण्यानुसार, नेहा ही त्यांची २१ वर्षीय विवाहीत मुलगी गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. बुधवारी रात्री ती घराबाहेर येऊन एका तरूणाशी बोलत होती. तेवढ्यात तिचा काका संतोष आरणे याने हे दृश्य पाहिले. त्याला तिच्यावर संशय आला, तो संतापला आणि रागाच्या भरात तो कुऱ्हाड घेऊन आला. त्याने नेहाच्या दोन्ही पायांवर धारदार कुऱ्हाडीने वार करून तिला जबर जखमी केले.

हे पाहून कुटुंबियांनी तिला उपचारासांठी तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बराच रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

मृत तरूणीच्या आईच्या फिर्यादीच्या आधारे कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी संतोष याला अटक केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष आरणे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 494/23 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.