अश्लील साईटवर तिचा फोटो पाहून फोन येऊ लागले, त्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर; पोलिसही झाले हैराण
अहमदाबादमध्ये एका महिलेचे फोटो अश्लील साईटवर टाकण्यात आले. त्यामुळे फोन येऊ लागल्यावर पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
अहमदाबाद : जुगार आणि सट्टेबाजीत पैसे गमावल्यानंतर गुजरातमधील अहमदाबादमध्ये (ahmadabad) एका व्यक्तीने पत्नीवर सट्टा लावून पैसे कमावण्यास सुरुवात केली. आरोपीने पत्नीला (wife) त्याच्या मित्रांकडे देहव्यापारासाठी पाठवण्यास सुरुवात केली. यातून मिळणाऱ्या पैशातून तो जुगार खेळायचा. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अहमदाबादमधील नरोड पोलिसांना या प्रकरणाची तक्रार मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने एका व्यक्तीसोबत प्रेमविवाह केला होता. तरूणीने ज्या व्यक्तीशी लग्न केले त्याने तो मोठा व्यापारी असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर दोघांना एक मुलगी झाली.
जुगार आणि सट्टा खेळण्यास रोखले म्हणून पत्नीलाच केली मारहाण
नवऱ्याला क्रिकेटमध्ये सट्टा लावण्याची आणि जुगार खेळण्याची सवय असल्याचे पीडितेला समजले. यानंतर तिने पतीला वारंवार समजावले, मात्र तो तिचं काहीच ऐकत नव्हता. आरोपीने पत्नीशी भांडण सुरू केले. तो सट्टेबाजीत पैसे गमावत राहिला. जेव्हा तो खूप कर्जात बुडाला तेव्हा त्याने पत्नीला देह व्यापारासाठी त्याच्या मित्रांकडे पाठवण्याचे ठरवले. या गोष्टीला पत्नीने विरोध केला असता त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.
अश्लील साईटवर टाकला तिचा फोटो आणि नंबर
आरोपीने पत्नीला धमकी देऊन देह व्यापारात ढकलले. यातून मिळालेल्या पैशातून त्याने सट्टेबाजी सुरू केली, तसेच ज्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी पैसे घेतले होते, त्यांना पैसे परत द्यायचे. एके दिवशी पत्नीने विरोध केल्यावर त्याने तिचा न्यूड फोटो आणि मोबाईल नंबर पॉर्न साइटवर अपलोड करण्यात आला.
फोन आल्यावर त्रासलेल्या पीडितेने गाठले पोलिस स्टेशन
पीडितेला सतत फोन येऊ लागल्यानंतर तिने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. आरोपीने पीडितेला घराबाहेर काढले आणि मुलीला त्याच्याचसोबत ठेवले. पीडितेने मुलीला आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने ते मान्य केले नाही. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या पतीला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.