फोटो पाहा, अपघाताची दाहकता कळेल, पण कारमधील पाचही जण वाचलेत! कसे? वाचा

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खासगी कार उलटून भीषण अपघात

फोटो पाहा, अपघाताची दाहकता कळेल, पण कारमधील पाचही जण वाचलेत! कसे? वाचा
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 1:00 PM

अहमदनगर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील जांभुळवाडी इथं भीषण अपघात (Ahmednagar Accident) घडला. पण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. विशेष म्हणजे जी खासगी कार (Car Accident) पूर्णपणे उलटली होती, त्यामध्ये पाच प्रवासी होते. हे पाचही प्रवासी अगदी थोडक्यात बचावलेत. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यांनी अगदी थोडक्यात मृत्यूला हुलकावणी दिलीय.

संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी इथं होंडा कंपनीच्या एका खासगी कारचा अपघात झाला. ही कार भरधाव वेगात होती. कार चालक वेगाने गाडी चालवत होता. पण हा वेगच त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ ओढावली होती.

कार चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला. कार रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. हा अपघात इतका जबर होता की गाडीची चारही चाकं वर आणि गाडीचं संपूर्ण छत शेतात, अशी अवस्था झाली होती. खाली डोकं वर पाय केल्याप्रमाणे या कारचा भीषण अपघात घडला होता.

या अपघातानंतर कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या कारमध्ये एकूण पाच जण होते. हे पाचही जण थोडक्याच वाचलेत. त्यातील काही जणांना किरकोळ दुखापत झालीय. तर काहींना जबर मार बसलाय. स्थानिकांनी या कारमधील प्रवाशांची मदत केली आणि जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

खरंतर गेल्या 48 तासांत राज्यात अपघातांची मालिका सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अमरावतीत एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तिघा दुचाकीस्वारांचा जागीच जीव गेलाय. तर नागपूर मुंबई महामार्गावरही ट्रकचा भीषण अपघात झाला.

नागपूर मुंबई महामार्गावर वाशिम जवळ झालेल्या अपघात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा ट्रक थेट एका कारवर कोसळला होता. पण सुदैवानं कारमधील प्रवाशी अगदी थोडक्यात वाचले होते.

राज्यातील रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे आता चिंता वाढली आहे. वारंवार अतिवेग, ओव्हरटेकिंग, लेन कटिंग यामुळे अपघात होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी कडक शिस्त कशी लावली जाईल, या अनुषंगाने उपाययोजना करण्याचीही गरज व्यक्त करण्यात येतेय.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.