अहमदनगरात घरातच तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, अत्याचार करुन खून केल्याचा पोलिसांना संशय
अहमदनगरात एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय आहे. पारनेर तालुक्यातील जवळे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
अहमदनगर : अहमदनगरात एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणीवर अत्याचार करुन तिचा खून केल्याचा संशय आहे. पारनेर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
तरुणीवर अत्याचार करुन तिच्या तोंडात बोळा कोंबून खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. ही तरुणी घरात एकटीच असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आलाय. तर या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी केली जातेय.
या तरुणीचे आईवडील दोघेही रोजंदारीने कामाला जातात. यावेळी मुलगी घरात एकटी होती. क्लासला गेलेला तिचा भाऊ घरी आला तेव्हा त्याची बहीण घरात झोपलेली होती. ती प्रतिसाद देत नसल्याचं पाहून त्याने बाहेर येऊन आरडाओरड केला. त्यावेळी आजुबाजूचे लोक धावत आले. त्यांनी मुलीला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.
याप्रकरणी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहेय.
न्यूड फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या दोन मुलींमार्फत फसवून तिचे न्यूड फोटो काढण्यात आले. ते फोटो व्हायरल करुन तुझ्या आई – बाबांना दाखवेन, अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला.
एवढंच नव्हे तर त्या मुलीला वाटेल तिथे बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिल्यावर आरोपी नराधम आणि त्याला सहकार्य करणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी अटक केली.
कोल्हापुरात पोलिसाकडून बलात्कार
दुसरीकडे, कोल्हापुरात एक अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. येथे नागरीकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसाकडूनच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील ही संतापजनक घटना घडली आहे.
राजेंद्र गणपती पाटील असं अत्याचार करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. राजेंद्र पाटील हा पन्हाळा तालुक्यातील करंजफेन गावचा आहे. संबंधित पोलीस हा मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी पाटील विरोधात पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एका पोलिसानेच असे कृत्य केल्याने संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
न्यूड फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, तरुणासह दोघी जणींना अटक https://t.co/xMvLTrYQaL #Buldana | #Rape | #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
संबंधित बातम्या :