कोपरगाव गोळीबारामागे राजकीय कनेक्शन? आरोपीने आमदाराचे ‘ते’ स्टेटस ठेवत… कोल्हेंचे गंभीर आरोप

Ahmednagar Kopargaon firing Case : अहमदनगरमधील कोपरगाव येथे गोळीबाराची घटना समोर आली होती. या घटनेनंतर भाजप नेत्याने विद्यमान आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्या आरोपीने आमदाराचे स्टेटस ठेवल्यानंतर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय.

कोपरगाव गोळीबारामागे राजकीय कनेक्शन? आरोपीने आमदाराचे 'ते' स्टेटस ठेवत... कोल्हेंचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 9:14 PM

अहमदनगर येथील कोपरगाव येथे गुरूवारी गोळीबाराची घटना घडली होती. संध्याकाळी पाचच्या सुमारास गोळीबार झाल्यामुळे कोपरगाव शहरामध्ये खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर ही गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गोळीबारामध्ये तन्वीर बालम रंगरेज हा तरुण जखमी झाला होता. पोलिसांनी सदर ठिकाणी धाव घेऊन पंचनामा आणि इतर कायदेशीर कारवाई करत रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गटातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्व वैमनस्यातून सदर गोळीबार झाला असल्याची माहिती शिर्डीचे पोलीस उप-अधीक्षक शिरिष वमने यांनी दिली.

कोपरगाव गोळीबार प्रकरणानंतर भाजप नेते विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे आणि त्यांचे स्वीय सहायक जोशी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. इतकंच नाहीतर गोळीबार करणारा आरोपी नाझिम शेख आमदार आशुतोष काळे यांचा कार्यकर्ता आहे. आरोपीने आमदार काळे यांचे बॉस असं म्हणून स्टेटस ठेवल्याचंही विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ दाखवतही कोल्हेंनी दाखवले.

कोपरगाव शहरात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू आहेत. शहरात गुन्हा करणारे लोक आमदारांचा बिल्ला लाऊन शहरात फिरतात. शहरातील गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नाही. अवैध व्यवसायांना विद्यमान आमदार राजास्त्राय देत असून पोलिसांना आमची विनंती अवैध व्यवसायांना आळा घालावा, असं विवेक कोल्हे म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत जनता आमदारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. शहरात घडणाऱ्या गुन्ह्याबाबत आम्ही वेळोवेळी माहिती दिली आहे. अवैध व्यवसाय बंद व्हावे यासाठी आंदोलन मोर्चे देखील काढले आहे. स्थानिक राजकीय दबावापोटी गुन्हेगारांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.