Ahmednagar : या जिल्ह्यात आठवडी बाजारात चोरलेल्या शेळ्या स्विफ्ट कारमधून विकल्या जातात
ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अहमदनगर : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या (Farmer) शेळ्या चोरून आठवडे बाजारात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील (kopargaon) कोकमठाण येथील शेतकऱ्याच्या चोरी केलेल्या शेळ्या स्विफ्ट कारमधून (Swift Car) आठवडे बाजारात विक्रीसाठी आणल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळली. त्यानंतर सापळा लावून तीन शेळ्यांसह आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या शेळ्या पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. आरोपींकडून चोरीच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पोलिसात दिली होती. त्याबरोबर मागच्या अनेक दिवसांपासून शेळ्या चोरीला जाण्याच्या घटनेत सुध्दा वाढ झाली आहे. पोलिसांनी शेळ्या चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला, स्विफ्ट कारने बाजारात विकायला येणाऱ्या शेळ्या पकडल्या. त्यावेळी पोलिसांना तीन शेळ्या सापडल्या, त्या त्यांनी शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या. त्याचबरोबर स्विफ्ट कारसह चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. कारण त्यांच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.