VIDEO | अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन गटात राडा

अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे आणि नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

VIDEO | अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन गटात राडा
अहमदनगर शिवसेनेच्या दोन गटात राडा
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 8:51 AM

अहमदनगर : अहमदनगर महापौरपदाची निवडणूक (Ahmednagar Mayor Election) अवघ्या काही तासांवर आली असताना शिवसेनेच्या दोन गटात राडा पाहायला मिळाला. महापौर निवडीवरुन अहमदनगरमधील शिवसेना नगरसेवकांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास वादावादी झाली. यावेळी शिवसेना नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. (Ahmednagar Mayor Election ruckus in two groups of Shivsena)

शिवसेना नगरसेवक अनिल शिंदे आणि निलेश भाकरे यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाही धक्काबुक्की झाल्याची चर्चा होती, मात्र आपल्याला कोणतीही धक्काबुक्की झाली नसल्याचं स्पष्टीकरण कोरेगावकरांनी दिलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याच्या आदल्या रात्री सेनेच्याच दोन गटांमध्ये राडा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अहमदनगर महापौर निवडणूक

अहमदनगरच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी (Ahmednagar Mayor Election) आज (बुधवार 30 जून) निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेला महापौरपद, तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद असा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवरच ठरला आहे.  शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Shivsena Rohini Shendage) यांची महापौर तर राष्ट्रवादीच्या गणेश भोसले (NCP Ganesh Bhosale) यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. फक्त दोघांचे अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

पाहा व्हिडीओ :

भाजपला धक्का

याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भाजपने (BJP) तिसरी महापालिका गमावली. अहमनगर महापालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

अहमदनगर महापिकेत 68 नगरसेवक आहेत. त्यात श्रीपाद छिंदमचं पद रद्द झाल्याने सध्या 67 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 34 नगरसेवक लागणार आहेत.

अहमदनगर महापालिका पक्षीय बलाबल

शिवसेना- 23 राष्ट्रवादी-18 भाजप-15 काँग्रेस-5 बसपा-4 सपा-1 अपक्ष-2

एकूण – 68

संबंधित बातम्या :

सांगली, जळगावनंतर भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेत महाविकास आघाडी पॅटर्न

अहमदनगर महापौरपदासाठी सेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

योग जुळला, तर पुन्हा एकत्र येऊ, सुजय विखेंचं सूचक वक्तव्य, नगरमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर?

(Ahmednagar Mayor Election ruckus in two groups of Shivsena)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.