अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, महिलेचे शिर उडवून बालकाला संपवणारा सापडला

Ahmednagar Shevgaon Double Murder : सात दिवसांपूर्वी 45 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलाचा मृतदेह शेवगावात आढळले होते.

अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा, महिलेचे शिर उडवून बालकाला संपवणारा सापडला
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 7:58 AM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना आठवड्याभरात यश आलं आहे. शेवगाव तालुक्यात झालेल्या 45 वर्षीय महिला आणि 15 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Ahmednagar Shevgaon Double Murder Case solved)

मालमत्तेच्या वादातून दोघांची हत्या

सात दिवसांपूर्वी महिला आणि मुलगा असे दोन अज्ञात मृतदेह आढळले होते. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आणखी दोन आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशेजारी मृतदेह आढळले

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरालगत असलेल्या 24 जानेवारीला दोघांचे मृतदेह सापडले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाचे शीर गायब करण्यात आले होते. तर मुलाच्या डोक्याला जबर मार लागल्याच्या खुणा होत्या. जवळच काही संसारोपयोगी साहित्यही आढळले होते.

गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यातच दोघांची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

चंद्रपुरात फिल्मी स्टाईल हत्याकांड

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात रविवारी झालेल्या हत्येच्या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना अवघ्या काही तासात यश मिळाले. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड या सरकारी कोळसा कंपनीत व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याची माहिती आहे. प्रतिस्पर्ध्याचा सूड घेण्याच्या उद्देशाने फिल्मी स्टाईल हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Ahmednagar Shevgaon Double Murder Case solved)

हात एकमेकांना ओढणीने बांधून नागपुरात कुटुंबाची आत्महत्या

नागपुरात पती-पत्नीने मुलीसह सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्याच्या आंभोरा येथील वैनगंगा नदी पात्रातील बॅक वॉटरमध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली. श्याम गजानन नारनवरे (वय 46), सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी तिघांची नावे आहेत. हे दाम्पत्य नागपूरच्या वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात गँग्स ऑफ वासेपूरची पुनरावृत्ती, एका मर्डरचा उलगडा!

हात एकमेकांना ओढणीने बांधले, नागपुरात 12 वर्षांच्या मुलीसह पती-पत्नीची आत्महत्या

(Ahmednagar Shevgaon Double Murder Case solved)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.