होम स्टे मालकाकडे 2000 हून अधिक जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ, सिक्रेट कॅमेराने खासगी क्षणांचं शूटिंग

पोलिसांनी आरोपी जय एली याच्याकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅब आणि फोन जप्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तो व्हिडीओ चित्रिकरण करत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेतील टेक्सास शहरात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

होम स्टे मालकाकडे 2000 हून अधिक जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ, सिक्रेट कॅमेराने खासगी क्षणांचं शूटिंग
सिक्रेट कॅमेरा लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ काढले
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:32 PM

वॉशिंग्टन : एक-दोन नव्हे, तर तब्बल 2000 हून अधिक जणांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण (Obscene Video) केल्याचा गंभीर आरोप होम स्टे मालकावर केला जात आहे. एअरबीएनबी (Airbnb) या प्रख्यात ऑनलाईन कंपनीचा होस्ट असलेल्या आरोपीने आपल्या अतिथीगृहात थांबलेल्या हजारो पाहुण्यांवर पाळत ठेवून त्यांना नको त्या अवस्थेत चित्रित केल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेतील टेक्सास (Texas America) शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. Airbnb कंपनी सुट्टीनिमित्त बाहेरगावी आलेल्या प्रवाशांना होमस्टे उपलब्ध करुन देते. अमेरिकेसह अनेक देशात या हॉस्पिटॅलिटी कंपनीने नाव कमावले आहे. पाहुण्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ-फोटो शूट करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एअरबीएनबी कंपनीने त्याची प्रॉपर्टी आपल्या साईटवरुन बॅन केली आहे.

वर्षभरापासून गुप्तपणे चित्रिकरण

‘मेट्रो’ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार 54 वर्षीय आरोपीचं नाव जय एली (Jay Allee) आहे. त्याने आपल्या होम स्टेमधील रुममध्ये सिक्रेट कॅमेरा सेटअप केला होता. ऑनलाईन शोध घेतल्यानंतर त्याने हे डिव्हाईस खेरदी केले होते. पोलिसांनी जयकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅब आणि फोन जप्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तो व्हिडीओ चित्रिकरण करत असल्याचं समोर आलं आहे.

अल्पवयीन मुलीला भयाण अनुभव

17 वर्षांची तरुणी Airbnb च्या संबंधित होम स्टेमध्ये थांबली होती. तिथे थांबण्याचा अनुभव तिने एखाद्या भयपटासारखं असल्याचं सांगितलं. नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी जय एलीला अटक केली होती. चार प्रकरणांमध्ये तेव्हा तो आरोपी होता. मात्र आता त्याच्यावर 15 प्रकरणांमध्ये केस दाखल करण्यात आली आहे.

होम स्टेमध्ये राहायला आलेल्या पाहुण्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सोबतच त्यांच्या भावनांना धक्का पोहोचवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एलीच्या वकिलांनी मात्र आपला अशील निर्दोष असल्याचं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

नागपुरात 21 वर्षांच्या मामीकडून 16 वर्षांच्या भाच्याचे लैंगिक शोषण, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

एकदा पोलिसांनी समज देऊन सोडलं, पुन्हा महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवले, तरुणाला बेड्या

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून डॉक्टरचा अश्लील व्हिडीओ शूट, तरुणीने सव्वातीन लाख उकळले

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.