Akola Accident : शिवशाही बसमधील 35 प्रवाशांवर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! टेम्पो चालक मात्र जागीच ठार

Akola Accident News : राष्ट्रीय महामार्ग व्याळाजवळ सकाळच्या सुमारास हा अपघात घडला

Akola Accident : शिवशाही बसमधील 35 प्रवाशांवर काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! टेम्पो चालक मात्र जागीच ठार
भीषण अपघात
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 2:18 PM

अकोला : अकोल्यात टेम्पो आणि शिवशाही बसची (Akola Accident News) समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातातमध्ये (Akola Shivshahi bus And tempo Accident) चालक जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झालाय. या अपघातात टेम्पोचं मोठं नुकसान झालं. तर शिवशाही बसच्या दर्शनी भागाचंही नुकसान झालंय. बाळापूर पोलीस (Akola Crime News) ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अजय तिकांडे असं अपघातात मृत्यू झालेल्या टेम्पो चालकाचं नाव आहे. तर गजानन धर्माळे हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. राष्ट्रीय महामार्ग व्याळाजवळ सकाळच्या सुमारास हा अपघात घडला होता. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्याळानजीक शिवशाही बस आणि टेम्पो यांची समोरसमोरच जोरदार टक्कर झाली. नागपूर-शेगाव या शिवशाही बसला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पोने ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, टेम्पो चालकाला ओव्हरटेकींगचा नाद जीवावर बेतला. बसच्या धडकेत टेम्पो चालक अजय तिकांडे (46) जागीच मृत्यूमुखी पडला. या अपघातानंतर काही काळ या मार्गावरीच वाहतूक विस्कळीत झाली होती.

टेम्पो चालकावर काळाचा घाला

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीन बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताचा पंचनामा केला. तर गजानन धर्माळे (30) हा या अपघातातून थोडक्यात बचावला. धर्माळे याला पोलिसांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

35 प्रवासी थोडक्यात वाचले

शिवशाही बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. शिवशाही बसच्या चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून टेम्पोचा मात्र चक्काचूर झाला. या अपघातामध्ये बसच्या समोरची काचेचं नुकसान झालेलं होतं. बाळकृष्ण मोरे असं शिवशाही बसच्या चालकाचं नाव असून ज्ञानेश्वर शेगोकार हे शिवशाही बसचे वाहक म्हणून यावेळी कर्तव्यावर होते.

हे सुद्धा वाचा

या अपघातमध्ये शिवशाही बस चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळे बसमधील प्रवासी थोडक्यात बचावलेत. शिवशाही बसचा क्रमांच एमएच 06 बी डब्ल्यू 3562 असू अपघातग्रस्त मालवाहू टेम्पोचा क्रमाक MH 27 BX 2231 आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.