Akola : उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या, माजी सरपंचांसह 21 जणांवर गुन्हा दाखल

माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या मोटारसायकलने निघाले असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी चिडलेल्या सरपंचांनी तिथल्या कंपनीच्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांनी उद्धट उत्तरे दिली. तसेच त्यांची तिथे शाब्दीक बाचाबाची झाली.

Akola : उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या, माजी सरपंचांसह 21 जणांवर गुन्हा दाखल
उद्धट उत्तर दिल्याने गावकऱ्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्याImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 8:54 AM

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातल्या पातूर ते अकोला रोडच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारी भंडारज (Bhandaraj) येथील माजी सरपंच दिपक इंगळे (Deepik Ingale) हे आपल्या मोटारसायकलने जात असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी दिपक इंगळे यांनी याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. जाब विचारल्यानंतर सरपंचांना कंपनीच्या लोकांनी उद्धट उत्तर दिले. ही माहिती गावातील नागरिकांना समजताचं त्यांनी मेट्रोकारलो कंपनीच्या गाड्या फोडल्या. 13 ते 14 गाड्यांच्या काचा फोडून मशीन चे सुद्धा नुकसान करण्यात तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं

माजी सरपंच दिपक इंगळे हे आपल्या मोटारसायकलने निघाले असता त्यांचा अपघात झाला. त्यावेळी चिडलेल्या सरपंचांनी तिथल्या कंपनीच्या लोकांना जाब विचारला. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांनी उद्धट उत्तरे दिली. तसेच त्यांची तिथे शाब्दीक बाचाबाची झाली. ही खबर गावातील नागरिकांना लागली. त्यांनी लोखंडी साहित्य आणि लाकडी का़ठ्यांच्या साहाय्याने कंपनीच्या 13 ते 14 गाड्या फोडल्या. तसेच तिथं असलेलं कंपनीचं मशीन देखील फोडलं आहे. या मारहाणमध्ये कंपनीचे कर्मचारी कृष्णा अष्णप्पा लोखंडे, संजयसिंह जुदागीरसिंग, रितुराज श्रीबाळकृष्ण, विनोद विद्यासागर भारती इत्यादी कर्मचारी जखमी झाले आहेत. याबाबत पातूर पोलीस स्टेशनला गावातील 21 युवकांवरती गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पातूर पोलीस करत आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक युवकांची नावे तक्रारीत

काही दिवसापूर्वी भंडारज येथे गावातील महिलांनी गावातील अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारला होता. या घटनेचा राग म्हणून शनिवारी झालेल्या घटनेत गावात नसलेल्या अनेक युवकांची नावे टाकण्यात आली असल्याची चर्चा जोरात सुरु होती.

पण या प्रकरणाला राजकीय किनार असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे. तपास पुर्ण झाल्यानंतर याबाबतचं खरं सत्य बाहेर येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.