छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा पुतण्या बेपत्ता, अल्पवयीन मुलाचा रविवार रात्रीपासून शोध सुरु
छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा पुतण्या बेपत्ता झाला आहे. रविवारी रात्री 8 वाजल्यापासून अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो स्कूल ऑफ स्कॉलरमधे इयत्ता सहावीत शिकत आहे.
अकोला : छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा अल्पवयीन पुतण्या बेपत्ता (Minor Boy Missing) आहे. काल (रविवार तीन एप्रिल) रात्रीपासून तो राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची माहिती. संभाजी काळे असं 13 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो अकोल्यातील सांगळूद येथून बेपत्ता झाला आहे. संभाजी काळे अकोल्यातील (Akola Crime) स्कूल ऑफ स्कॉलरमधे इयत्ता सहावीत शिकत आहे. तो स्वतःहून घर सोडून गेला, की त्याचं अपहरण (Kidnap) झालं, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र तो घर सोडून पळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संभाजी काळे याचा फोटो कुटुंबीय आणि पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. कोणालाही त्याच्याविषयी माहिती मिळाली किंवा तो सापडला, तर जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा पुतण्या बेपत्ता झाला आहे. काल (रविवार 3 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून त्याच्या संपर्क झालेला नाही. संभाजी काळे असं रणजित काळे पाटलांच्या 13 वर्षीय बेपत्ता पुतण्याचं नाव आहे.
अकोल्यातून बेपत्ता
संभाजी काळे हा अकोल्यातील सांगळूद येथून बेपत्ता झाला आहे. तो स्कूल ऑफ स्कॉलरमधे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे. संभाजीचं कोणी अपहरण केलं का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र तो घर सोडून गेल्याची अधिक शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
संभाजी काळे याचा फोटो कुटुंबीय आणि पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. कोणालाही त्याच्याविषयी माहिती मिळाली किंवा तो सापडला, तर जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक
तू माझा मुलगा नाहीस, 17 वर्षीय मुलाला बापाने हिणवलं, लेकाने जीवच घेतला
मित्रांसोबत पोहायला गेला, पण परतलाच नाही; पुण्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू