Akola : अकोल्यातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! 2 महिलांसह दोघा पुरुषांना रंगेहाथ अटक
Akola Crime : अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनिय कलम 3, 4, 5 पीटा कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अकोला : अकोल्यात (Akola Crime) सुरु असलेल्या एका कुंटणखान्यावर पोलिसांनी कारावाई केली आहे. सापळा रचून पोलिसांनी या कारवाईदरम्यान, चौघांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सध्या या चौघांविरोधात गुन्हा दाखल (4 People booked) करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीक एक कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा (Akola Police Raid) टाकून ही कारवाई केली आहे. एक महिला घरामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील मुली बोलवून देहविक्रीचा व्यवसाय चालवत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेत अखेर सापळा रचून चौघांना अटक केली आहे. यासह काही मोबाईल फोन आणि मुद्देमालही पोलिसांनी जप्त केलाय. सध्या या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली जातेय.
उरळ पोलीत ठाण्यात गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निमकर्दा इथं एका महिलेच्या घरात पोलिसांनी छापा टाकला. या कुंटणखान्यावर पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या पथकानं सापळा रचून छापेमारी केली. या छापेमारीमध्ये चौघांना रंथेहाथ पकड्यात पोलिसांना यश आलं आहे. उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कुंटणखाना चालवला जात होता. त्यानुसार आता उरळ पोलीस ठाण्यातच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : महत्त्वाची बातमी
बाहेरच्या जिल्ह्यातून आणल्या जात होत्या मुली
अटक करण्यात आलेल्या चौघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनिय कलम 3, 4, 5 पीटा कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या अटक करण्यात आलेल्या कसून चौकशी केली जाते आहे. बाहेरच्या जिल्ह्यातूल कुंटणखान्यात मुली बोलवून देहव्रिकीचा व्यवसाय करणाऱ्यांचं हे रॅकेट मुळापासून उपटून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
सेक्स वर्क प्रोफेशन
गुरुवारीच सुप्रीम कोर्टानं सेक्स वर्क हे एक प्रोफेशन असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता. संमतीनं जर प्रौढ व्यक्ती सेक्स वर्कचं काम करत असेल, तर अशा सेक्स वर्क्सना अटक करुन नये, तसंच त्यांना त्रास देऊ नये, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. मात्र देहविक्रीचा व्यवसाय चालवणं हे बेकायदेशीरच असेल, असंही सुप्रीम कोर्टानं यावेळी स्पष्ट केलं होतं.