ते दोघं पक्के जिगरी दोस्त, खारे फुटाणे विकायचे मग एकानं दुसऱ्याचा काटा का काढला? वाचा अकोल्याची क्राईम स्टोरी

क्षुल्लक कारणावरुन  किरकोळ व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Akola Crime Murder)

ते दोघं पक्के जिगरी दोस्त, खारे फुटाणे विकायचे मग एकानं दुसऱ्याचा काटा का काढला? वाचा अकोल्याची क्राईम स्टोरी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 11:48 AM

अकोला : एका क्षुल्लक कारणावरुन  किरकोळ व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला शहरातील अकोट फाईल परिसरात ही घटना घडली. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (Akola Crime One Person Killed Another Person)

उधारीवरुन वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अकोट फाईल पोलीस स्टेशन हद्दीत संत कबीर नगर नावाचे एक नगर आहे. या ठिकाणी नरेश खुशाल मेगवाणे आणि सोहम गौतम गायकवाड असे दोघे जण राहतात. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते दोघेही अकोट फाईल आणि रेल्वेस्टेशन परिसरात चुरमुरे, फुटाणे विक्रीचा किरकोळ व्यवसाय करत होते. त्या दोघांमध्ये व्यवसायातील उधारीवरुन आठ दिवसांपासून वाद सुरु होते.

या वादात सोहम गौतम गायकवाड, रोहित गायकवाड आणि राजकुमार या तिघांनी नरेश खुशाल मेगवाणे याला एका ठिकाणी बोलवले. त्यानंतर पूरपीडित कॉलनी परिसरात त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर हे तिन्ही आरोपी फरार झाले.

दोघांना अटक

या घटनेची माहिती अकोट फाईल पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंत पोलिसांनी सूत्रांच्या मदतीने दोघांना अटक केली. सध्या याचा पुढील तपास अकोट फाईल पोलीस करीत आहे.

दरम्यान गेल्या 8 दिवसात अकोला शहरात 4 जणांची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांच्या वचकवर प्रश्नचिन्न निर्माण होत आहे.  (Akola Crime One Person Killed Another Person)

संबंधित बातम्या : 

सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?

चोरी करताना तो घालायचा साडी; तरीही 24 तासात पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अर्धवट जळालेली तरुणी, बाजूला कपड्यांची बॅग आणि सायकल, मृतदेहाजवळच्या चिठ्ठीने संशय वाढवला

100 छापे, 102 दिवस पाठलाग, वेशांतर, रुमला लॉक लावून वास्तव्य, बाळे बोठेच्या अटेकमागील थरार

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.