VIDEO | रोड रोलरखाली सायलेन्सर चिरडले, अकोला पोलिसांची धडक कारवाई
अकोल्यात बुलेटचा सायलन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले (Akola Bike silencer Road Roller)
अकोला : बुलेटचा सायलन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या अकोल्यातील बाईक चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने 45 सायलेन्सर रोडरोलर खाली चिरडण्यात आले. त्यामुळे गोंगाट करणाऱ्या बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. रोडरोलरखाली सायलेन्सर चिरडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Akola Police Destroys loud Bike horn silencer under Road Roller)
सायलन्सर बदलून मोठा आवाज
अकोल्यात बुलेटचा सायलन्सर बदलून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिले आहेत. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा बाईक चालकांवर कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या बाईकचे सायलन्सरही काढण्यात आले.
45 सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट
कारवाईनंतर हे सायलेन्सर परत न देता रोडरोलर खाली चिरडण्यात आले. वरिष्ठांची परवानगी घेत न्यायालयाच्या आदेशाने तब्बल 45 सायलेन्सर रोडरोलर खाली नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्या बाईक चालकांचे धाबे दणाणले आहेत. वाहतूक पोलिसांचे प्रमुख गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात ही अनोखी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
म्हणून सायलेन्सर काढून टाकले…
कर्कश्श हॉर्न आणि कानाला त्रास होईल असे सायलेन्सर काढून टाकण्याचे आवाहन करुनही अनेक दुचाकीस्वार आपल्या बाईकला मोठा आवाज असणारे सायलेन्सर लावून शहरात फिरत होते. दवाखाना, शाळा, सरकारी कार्यालये, बाजारपेठ अशा सगळ्या ठिकाणी कर्कश्श आवाजाच्या बाईक उडवत अनेक जण फिरत होते.
पाहा व्हिडीओ :
काही दिवसांपूर्वी लातूरच्या रस्त्यांवरुन कर्कश्श आवाज करत धावणाऱ्या जवळपास 300 बाईक्सवर पोलिसांनी कारवाई केली होती. कर्कश्श फायरिंगसाठी लावण्यात आलेले सायलेन्सर वाहतूक पोलिसांनी रोड रोलरखालीच चिरडले होते. काढून टाकलेले सायलेन्सर पुन्हा विकले जाऊ लागल्याने सायलेन्सर चिरडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
संबंधित बातम्या :
VIDEO | रोड रोलरखाली कर्कश्श हॉर्न आणि सायलेन्सर चिरडले, लातूर पोलिसांचा धमाका
(Akola Police Destroys loud Bike horn silencer under Road Roller)