Akola : अकोला रेल्वेत कुरीअर सर्विसने 2 किलो सोनं 100 किलो चांदी कुणाची ?
संबंधित प्रकरणाची माहिती जीएसटी विभागाला दिली असून जीएसटीच्या अधिकार्याकडून याचा काय खुलासा येतो. याची पोलिस वाट पाहत आहात आहेत.
अकोला : अकोला लोहमार्ग पोलिसांनी (Akola Railway Police) आज अकोला रेल्वे स्थानकावर मुंबई येथून आलेलं सोने चांदी (Gold Silver) कुरियरने (Courier Services) हस्तगत केली असून सोने आणि चांदी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये 100 किलो चांदी आणी दोन किलो सोनं आहे. तर आंगडिया कुरीअर सर्विसने हे सोनं-चांदी अकोल्यात आलं आहे. तर आता हे सोनं-चांदी कुणाची आहे ? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अचानक पोलिसांनी एका संशयित व्यक्तीची तपासणी केली त्यावेळी त्याने पोलिसांना बॅग दाखवायला नकार दिला. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी त्याची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेतील सोने आणि चांदी पाहून पोलिसही चक्रावले. नेमके सोने कोणाचे असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. जीएसटी अधिकारी आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.
एवढी चांदी आणि सोनं पाहून पोलिसांच्या भुवया उंचावल्या
जिल्ह्यातील सराफा व्यावसायिक हे रेल्वे पोलिस ठाण्यात आले असून सोने आणि चांदीच्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तर मुंबईवरून अकोल्याकडे येत असलेल्या रेल्वेत प्रवास करणाऱ्या व्यक्ती जवळ एक मोठी बॅग होती. यादरम्यान रेल्वेत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो बॅगच्या तपासणीसाठी नकार देत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आणी त्याच्या बॅगची झडती घेतली असता. चांदी आणि सोन हे पोलिसांना दिसून आला. त्यामुळे एवढी चांदी आणि सोनं पाहून पोलिसांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर या संदर्भात त्याला अधिक विचारणा केली असता. त्याने आपण आंगडिया कुरीअर सर्विसचे काम करतोय आणि हे पार्सल अकोल्यातील असल्याचे उत्तर दिले. यानंतर पोलीस त्याला ताब्यात घेतले असून आंगडिया कुरीअर सर्विसच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. हे सोनं आणि चांदी ही सराफा व्यवसायिकांची असल्याचं कुरियर सर्व्हिस कडून सांगण्यात आले आहे.
जीएसटी अधिकारी आल्यानंतर प्रकरण स्पष्ट होईल
संबंधित प्रकरणाची माहिती जीएसटी विभागाला दिली असून जीएसटीच्या अधिकार्याकडून याचा काय खुलासा येतो. याची पोलिस वाट पाहत आहात आहेत. तर यासंदर्भातील पोलीस आणि सबंधित विभाग हे सराफा व्यवसायिकाकडून सोने-चांदीच्या बिलाचे कागदपत्र चेक करत आहेत. तरीही पण नेमकं हे सोनं आणि चांदी कुणाचं याची माहिती मिळू शकलेली नाही. कारण काही सोनं आणी चांदीचे कागद पत्रांची पूर्तता झाली असली तरीही इतर सोनं-चांदीची कागदपत्र तपासणी सध्या सुरु असून सकाळी जीएसटीचे अधिकारी या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे उद्याला जीएसटी अधिकारी आल्यानंतर या प्रकरणाचा नेमका खुलासा होईल. हे सोनं चोरीच की व्यापाऱ्याचं, पण आज सोन आणि चांदी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले होते.