ट्रेन पकडताना गडबड झाली, महिलेचा तोल गेला, मग तिथं असलेल्या…
अकोला रेल्वे स्टेशनवर गडबड घाईत रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात तोल गेल्याने एक महिला रेल्वेखाली येत होती, परंतु ती असलेल्या विक्रेत्याने अशी कामगिरी केली केली सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे.
गणेश सोनोने, अकोला : अकोला (Akola) शहरातल्या रेल्वे स्टेशनवर (Railway Station) काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वाशिम येथील 42 वर्षीय बेबी खिलारे ही महिला मुंबईला जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर आली होती. पण तेवढ्यात अमरावतीवरून मुंबईला जाणारी अंबा एक्सप्रेस ही स्टेशनवरून निघाली. तर चालती ट्रेन तिच्या मुलीने पकडली. पण ही महिला ट्रेन पकडत असताना तिचा पाय घसरून तोल गेला, आणि ती रेल्वेखाली जाऊ लागली. तेवढ्यात स्टेशनवर असलेला विक्रेता शंकर स्वर्गे याने त्या महिलेला ओढल्याने त्या महिलेचे प्राण वाचले आहेत. त्यानंतर त्या मुलीने ट्रेनमधून उडी घेतल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीमध्ये (CCTV) कैद झाला आहे.
मुलीने सुद्धा धावत्या ट्रेनमधून उडी घेतली
रेल्वेच्या विविध घटनांचे रोज व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. रात्री अकोला रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेमुळे स्टेशनवर असणारी मंडळी प्रचंड घाबरली आहेत. स्टेशनवरती यायला उशीर झाला. स्टेशनवर पोहचले, तेवढ्यात ट्रेन निघाली. मुलीने गडबड घाईत ट्रेन पकडली सुध्दा, परंतु आईला ट्रेन पकडता आली नाही. मुलीची आई ट्रेन खाली जात असल्याचं चित्र तिथं असलेल्या शंकर स्वर्गे याने पाहिले. त्यानंतर शंकर स्वर्गे यांनी त्यांना तात्काळ बाहेर ओढल्यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. त्याचबरोबर मुलीने सुद्धा धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. ती सुध्दा सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
विक्रेत्याने त्या महिलेला वाचल्याची माहिती सगळीकडे व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर रेल्वे पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी सुध्दा त्याचं कौतुक केलं आहे.