घरगुती कारणामुळे सतत वाद, मंत्र्यांच्या कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईकाचा गळफास

प्रशांत याची नुकतीच एका मंत्र्यांच्या डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशांत याची पत्नीही रायगड पोलीस दलात पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करतात.

घरगुती कारणामुळे सतत वाद, मंत्र्यांच्या कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या पोलीस नाईकाचा गळफास
suicide
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:01 AM

रायगड : मंत्र्याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका पोलीस नाईकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशांत ठाकूर (35) असे या पोलीस नाईकाचे नाव आहे. अलिबागमधील शिवाजीनगर या परिसरात राहत्या घरात पंख्याला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. प्रशांत यांनी घरगुती कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Alibag Minister Driver police officer committed  suicide due to some disputes)

प्रशांत ठाकूर हा अलिबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून काम करीत होता. प्रशांत याची नुकतीच एका मंत्र्यांच्या डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशांत याची पत्नीही रायगड पोलीस दलात पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करतात.

घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास

गेल्या आठ दिवसापासून प्रशांत यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो हा घरी एकटाच राहत होता. काल सकाळी अकराच्या सुमारास संबंधित मंत्र्यांच्या दौरा होता. त्यामुळे डिव्ही कारची चावी देण्यासाठी एक पोलीस कर्मचारी प्रशांत यांच्या घरी गेला. त्यावेळी त्याने बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. मात्र प्रशांतने काहीही दाद दिली नाही.

यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने अलिबाग पोलीस ठाण्यात संपर्क साधला. अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी प्रशांत हा फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला.

तपास सुरु

यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन प्रशांतचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रशांत याने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कारण समजलेले नाही. मात्र काही घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.

(Alibag Minister Driver police officer committed  suicide due to some disputes)

संबंधित बातम्या : 

दरोड्यासाठी गावठी कट्टा, कोयता, सुरीचा उपयोग; मनसेच्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांना बेड्या

मंदिर परिसरात वादावादी, अंबरनाथमध्ये 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.