Amaravati Murder Case:अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांची धक्कादायक कबुली
54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली(Amaravati Murder Case). नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणी पोलिसांची धक्कादायक कबुली दिली आहे. कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन नुपूर शर्मा प्रकरणीशी जोडण्यात आले आहे. नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अमरवती पोलिसांनी(Amaravati police) हा मोठा खुलासा आहे. पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी ही कबूली दिली आहे.
54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली(Amaravati Murder Case). नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
चाकूने सपासप वार करुन केली हत्या
कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.
पाच जणांना अटक दोघे फरार
या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अजूनही बेपत्ता आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हे याने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली.
अब्दुल तौफिक (24), शोएब खान (22) आणि अतिब रशीद (22) या तिघांना 25 जून रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी शमीम अहमद फिरोज अहमद हा अद्याप फरार आहे.
कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर आणि फॉरवर्ड केली होती. हा मेसेज त्याने मुस्लिम लोक असलेल्या ग्रुपवरही केला. त्यामुळे या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याने ही हत्या झाल्याचा संशय आहे.
एनआयएकडून चौकशीला सुरुवात
दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक अमरावती शहरात दाखल झाले असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केलेली आहे. मात्र स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नाही. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे एनआयए पथकाने पोलिसांकडून घटनेची सखोल माहिती घेतली असून, आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतलेली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हे हत्या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.