अंबरनाथ : हॉटेलमध्ये बसून सिगरेट प्यायला मनाई केल्यानं तरुणाचा हॉटेल चालकाशी वाद होऊन हाणामारी (Fighting) झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यावेळी तरुणाने हॉटेल चालकासह वेटरवर चाकूने हल्ला (Attack) केला. तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही या तरुणाला बेदम मारहाण केली. जयेश सोनावणे असे या तरुणाचे नाव आहे. तर ओमकार काशीद असे वेटरचे आणि अनिल मराडे असे हॉटेल मालकाचे नाव आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी जयेशला अटक करत न्यायालयात हजर केले. मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
अंबरनाथ सिगरेट पिण्यास मनाई केल्यानं हॉटेलमध्ये हाणामारी#Ambernath #Fighting #Hotel #CCTV pic.twitter.com/13tSn0bDmm
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) July 24, 2022
अंबरनाथच्या हुतात्मा चौकात मराठा शाही दरबार नावाचं हॉटेल आहे. शनिवारी रात्री या हॉटेलमध्ये दोन तरुण आले होते. यापैकी जयेश सोनावणे या तरुणाने हॉटेलमध्ये सिगरेट पिण्यास सुरुवात केली. मात्र हे फॅमिली हॉटेल असून हॉटेलमध्ये महिला ग्राहक सुद्धा बसलेल्या असल्यानं हॉटेलचा वेटर आणि हॉटेलचालक यांनी त्याला सिगरेट पिण्यास मनाई केली. यावेळी जयेश याचा या दोघांशी वाद झाला आणि त्यातून त्याने हॉटेलमधील पंखा ढकलून पाडला. त्यानंतर तो हॉटेल चालकाच्या दिशेनं जात असताना हॉटेलच्या वेटरने त्याला मागून पकडून खाली पाडलं. यावेळी जयेशने खिशातला बटन चाकू काढून वेटर ओमकार काशीद आणि हॉटेलचालक अनिल मराडे या दोघांवर चाकूने हल्ला केला. यात हॉटेल चालक अनिल मराडे यांच्या हाताला तर वेटर ओमकार काशीद याच्या पाठीवर दुखापत झाली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी जयेश याच्या हातातून चाकू काढून घेत त्याला खाली पाडून बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या घटनेनंतर हॉटेलचालक अनिल मराडे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी हल्लेखोर तरुण जयेश सोनावणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. न्यायालयानं लगेचच त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, या घटनेत झालेला वाद हा तात्कालिक आणि किरकोळ होता. हे स्पष्ट दिसत असून त्यानंतर फक्त चाकूहल्ला करणाऱ्या जयेश सोनावणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मालक तसेच वेटरवर अद्याप गुन्हा दाखल नाही. (Ambarnath banning smoking of cigarettes led to a scuffle in the hotel, the incident was caught on CCTV)