Ambernath Crime : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने रोखले अन् थेट… ‘त्या’ कृत्याने महिला हादरली
पीडित महिला घराच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागून बाईकवर दोन अज्ञात तरूण आले आणि त्यांनी कुसूम यांना हाक मारून थांबवलं. स्टेशनचा रस्ता कोणता असा प्रश्न विचारत एकाने त्यांना बोलण्यात गुंतवलं आणि...
अंबरनाथ | 26 ऑक्टोबर 2023 : शहरात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चोरी, लूट, पाकिटमारी, दरोडा, शस्त्राने वार, अशा अनेक घटनांमुळे शहरातील नागरिक धास्तावले असून ते अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी (thief) धूमाकूळ घातला असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुन्ह्याची अशीच एक घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. अंबरनाथमध्ये (Ambernath news) एका मंदिराजवळ महिलेच्या गळ्यातील चेन खेचून चोरट्यांनी पोबारा केला. बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील चेन खेचली (chain snatcher) आणि ते फरार झाले. त्या महिलेने आरडाओरजा केला , चोरट्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला. चोरीची ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्ता विचारण्याच्या बहाण्याने रोखले आणि
अंबरनाथ पश्चिम भागातील मोरीवली गावातील हनुमान मंदिर जवळ राहणाऱ्या कुसुम पवार यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला. कुसूम या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या, काम आटोपून त्या घराच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागून बाईकवर दोन अज्ञात तरूण आले आणि त्यांनी कुसूम यांना हाक मारून थांबवलं. त्यापैकी एका तरूणाने त्यांना अंबरनाथ स्टेशनकडे जाण्याचा रस्ता कोणता असा प्रश्न विचारला. त्यांना बोलण्यात गुंगवून ठेवलेले असतानाच, बाईकवरील दुसऱ्या तरूणाने चाकू काढला आणि त्यांना धमकावत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन खेचली आणि चोरट्यांनी बाईकवरून धूम ठोकली.
हे पाहून भांबावलेल्या कुसुम यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मदतीसाठी हाकाही मारल्या, मात्र तोपर्यंत चोरटे खूपच लांब निघून गेले. चोरीचा हा संपूर्ण प्रकार त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. याप्रकरणी पीडित महिलेने अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची तक्रा नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करत या सोनसाखळी चोरांचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येईल, अशी माहित लीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.