अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट, अखेर दलालांना अटक, महिलेची मात्र सुटका

ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सरार्सपणे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमाला (Thane Crime Branch) अटक केली आहे.

अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट, अखेर दलालांना अटक, महिलेची मात्र सुटका
obscene video
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 7:32 PM

Ambernath Crime News : मुंबईनजीक असलेल्या अंबरनाथमधून (Ambernath News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबरनाथ-बदलापूर या भागात सेक्स रॅकेटचा धंदा बेछूटपणे सुरु होता. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सरार्सपणे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमाला (Thane Crime Branch) अटक केली आहे. पोलिसांनी या नराधमाच्या कचाट्यातून पिडित महिलेची सुटका करत तिला जीवनदान दिलंय. सेक्स रॅकेट चालवणाऱ्या विकृताचं नाव सोनू काझी असं आहे. हा सोनू उल्हासनगरचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. (ambernath police arrested to 2 agents who runed sex racket know details)

सापळा लावला रंगेहाथ पकडला

अंबरनाथ-बदलापूर रोडवर रिलायन्स मार्केट आहे. या रिलायन्स मार्केट परिसरात दलालांमाफर्त गेल्या अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरु होतं. गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली. गुन्हे विभागाने मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचला. त्यानुसार गुन्हे विभागाने मंगळवारी 10 जानेवारीला ठरवल्यानुसार सापळा रचला. संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने अंबरनाथ-बदलापूर रोडवर सापळा रचला.

सेक्स रॅकेटच्या दलालाला रंगेहाथ पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट गिऱ्हाईकाला हाताशी घेतलं. हा बनावट गिऱ्हाईक सोनू काझीकडे गेला. सोनू आणि बनावट गिऱ्हाईकात 5 हजार रुपयात डील झाली. त्यानंतर सेक्स रॅकेटमधील महिला तिथे आली. सोनूने त्या महिलेला 5 हजार रुपयांपैकी 3 हजार रुपये दिले. तर बाकी 2 हजार रुपयातून सोनूने 1 हजार रुपये स्वत:कडे ठेवले. तर बाकीचे हजार रुपये हे त्याने साथीदार असलेल्या गगन शर्मा या रिक्षा ड्रायव्हरला दिले.

हे सुद्धा वाचा

गुन्हे पथक या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होतं. गुन्हे पथकाच्या अपेक्षेनुसार सर्व सुरु होतं. बनावट गिऱ्हाईकाने गुन्हे पथकाला दलालांच्या नकळत इशारा केला. गुन्हे पथकाने धाड टाकली. या धाडीत पथकानी सोनू आणि त्याचा साथीदार गगनला रंगेहाथ पकडलं.

ताब्यात घेतल्यानंतर या दोघांना अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणलं गेलं. या दोघांविरोधात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात अंबरनाथ पोलीस सखोल तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.