घर सोडण्यास सांगितलं, संतापलेल्या भाडेकरूची घरात घुसून मारहाण, महिलेसह 2 मुलांनाही चोपलं

अंबरनाथच्या पालेगाव परिसरात एका महिलेवर आणि तिच्या दोन मुलांवर भाडेकरूने बेदम मारहाण केली. तीन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेतली नाही, असा आरोप आहे. भाडेकरूला घर रिकामे करण्यास सांगितल्यावरून झालेल्या वादानंतर हा हल्ला झाला.

घर सोडण्यास सांगितलं, संतापलेल्या भाडेकरूची घरात घुसून मारहाण, महिलेसह 2 मुलांनाही चोपलं
अंबरनाथमध्ये महिलेला मारहाण Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 12:14 PM

मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या अंबरनाथ शहरात गुन्ह्यांच्या प्रमाण वाढलं असून कधी काय होईल याचा नेम नाही. सामान्य माणसाने जगायचं कसं असा प्रश्न सध्या सर्वांना वाढत्या गुन्ह्यांमुळे पडला आहे. त्यात आता घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांनाही काही जणांनी मारहाण केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. अंबरनाथच्या पालेगाव पसिरात ही धक्कादायक घटना घडली असून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या इसमानेच ही मारहाण केल्याचं उघड झालंय. या घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी त्याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली नाही , उगाच चकरा मारायला लावल्या असा फिर्यादी महिलेचा आरोप आहे. अखेर याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रहाण, विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाडेकरूने केली बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात 9 तारखेला हा धक्कादायक प्रकार घडला. तेथे उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला याच सोसायटीत फ्लॅटमध्ये राहतात, तर त्यांची बहीण अर्चना यांनी मात्र त्यांचा फ्लॅट भाड्याने दिला आहे. माँटी भरोडिया हा इसम त्या फ्लॅटमध्ये भाड्याने रहात होता. मात्र यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यातील करार संपल्याने उर्मिला यांनी माँटी यांना ते घर रिकाम करून सोडण्यास सांगितलं.

पण याच मुद्यवरून त्यांच्यात वाद होऊन झटापट झाली, नंतर ते प्रकरण तेथेच थांबलं. पण काही वेळानंतर भाडेकरू म्हणून राहणारे माँटी हे काही लोकांना सोबत घेऊन आले आणि उर्मिला यांच्या घरात घुसले. त्यांनी उर्मिला यांना मारहाण केली, एवढंच नव्हे तर त्यांच्या दोन लहान मुलांनाही सोडलं नाही, त्यांनाही चोप दिला. तसंच उर्मिला यांच्या घरातील सामानाची तोडफोड करत बरीच नासधूसही केली, तेथील महापुरूषांच्या फोटोंचीही विटंबना केल्याचा आरोप उर्मिला यांनी केला आहे.

यामुळे हादरलेल्या उर्मिला यांनी कशीबशी हिंमत गोळा करत शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण तेथे पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही. तक्रार दाखल करून न घेता, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा अशी फिरवाफिरव केली. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वत:च्या अक्षरात घडलेल्या प्रकाराबद्दल लिहून आणा, आम्ही काही लिहून घेणार नाही असं पोलिसांनी सांगितलं. आम्ही रात्रंदिवस तिथे बसून होतो, पण कोणीच तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप उर्मिला यांनी केला. सेटलमेंट करण्याच्याच बऱ्याच गोष्टी तिथे सुरू होत्या, पण मला त्यात रस नाही. मला फक्त न्याय हवा अशी मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रहाण, विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.