Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलंच ! जुगार खेळायची भारीच हौस, पोलीस येताच थेट गटारात लोटांगण, व्हिडीओ व्हायरल

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी थेट गटारात लोळण घेतली आहे. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समोर आला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

ऐकावं ते नवलंच ! जुगार खेळायची भारीच हौस, पोलीस येताच थेट गटारात लोटांगण, व्हिडीओ व्हायरल
आरोपींनी अशा प्रकारे गटारात लोळण घेतली
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 6:08 PM

औरंगाबाद : अटक तसेच गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे औरंगाबादेत एक अजब प्रकार घडला आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी थेट गटारात लोळण घेतली आहे. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या समोर आला असून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा प्रकार शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याअंतर्गत घडला आहे. (gamblers jump into gutter in Aurangabad to evade arrest)

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गटाराचा सहारा

मिळालेल्या माहितीनुसार शहराच्या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही लोक जुगार खेळत होते. पोलिसांना आपल्या गुप्तहेरांच्या मदतीने या प्रकाराची माहिती समजली. हा प्रकार समजताच पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी जुगार खेळणाऱ्यांनी थेट गटाराचा सहारा घेतला. त्यांनी थेट गटारात लोळण घेतली.

नालीच्या काठावर पोलिसांची शोधाशोध, आरोपी गटारात

पोलीस घटनास्थळी पोहोचताच आता आपल्याला अटक होणार असल्याचा सुगावा आरोपींना लागला. त्यांनी लगेच अटक तसेच गुन्हा दाखल न होण्यासाठी पुढचे पाऊल टाकायला सुरुवात केली. पोलिसांची नजर बाजूच्या गटाराकडे जाणार नाही असा अंदाज बांधत या आरोपींनी थेट गटारात लोळण घेतली. पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी या आरोपींनी थेट गटाराचा सहारा घेतला.

पाहा व्हिडीओ :

शेवटी आरोपींना अटक, गुन्हा दाखल

दरम्यान, आरोपींनी गटारमध्ये लोळण घेतल्यामुळे पोलिसांना त्यांचा शोध घेणे काही काळासाठी कठीण होऊन बसले होते. पोलीस नालीच्या काठावर आरोपींचा शोध घेत होते. तर आरोपी हे गटारात लोटांगण घेत होते. शेवटी शोधाशोध करुन पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या :

25 सेकंदांचा थरार, 18 वर्षांचा तरुण चेंबरमध्ये पडला, पुढे काय घडलं ?

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी, औरंगाबादेत बाजारपेठांच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी

औरंगाबादमध्ये हत्यांचं सत्र, 15 दिवसांत धारदार शस्त्रांनी 6 हत्या, गुन्हेगारांचा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न!

(gamblers jump into gutter in Aurangabad to evade arrest)

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.