कॅमेरा ऑन होता… अंगावर नव्हतं काहीच, तो बेशुद्ध पडला अन् मॉडेलने… ही घटना का आलीय चर्चेत?
मॉडेलकडे एका व्यक्तीने फेटिश कृत्य करण्याची मागणी केली. त्यानंतर हे करत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला.

ओन्ली फॅन्स मॉडेलवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. ती केवळ ३१ वर्षांची आहे. बीडीएसएम करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीने मॉडेलला पैसे देऊन हे काम करण्यास सांगितले होते. द सॅन डिएगो युनियन-ट्रिब्यून मधील एका अहवालानुसार, त्या व्यक्तीने मॉडेल मिकाएला ब्राशाये रायलार्सडॅमला फेटिश कृत्यांसाठी 11,000 डॉलर (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 9,57,656 रुपये) दिले होते. पण हे सगळं करत असताना त्या व्यक्तीता मृत्यू झाला आहे. व्यक्तीच्या डोक्यावर डक्ट टेपने बांधलेली पिशवी ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हे संपूर्ण कृत्य रायलार्सडॅमने रेकॉर्ड केले होते. ती ते तिच्या ओन्ली फॅन्ससोबत शेअर करणार होती. पोलिसांनी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यांना आढळले की ५५ वर्षीय मायकल डेल किमान आठ मिनिटे त्या बॅगेत आहे. तसेच मॉडलने त्या व्यक्तीच्या पायावर बूट चिटकवले होते. मात्र, जेव्हा न्यायलयात हा व्हिडीओ सादर करण्यात आला तेव्हा मॉडेलने हे त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले आहे.




डेलचे दोन वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातील एस्कॉन्डिडो येथील त्यांच्या घरी निधन झाले. मात्र, ओन्लीफॅन्स मॉडेलवर गेल्या महिन्यातच डेलच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी खटला चालवणारे डेप्युटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी डेव्हिड जार्मन हे अहवालात म्हटले की, मॉडेल विरोधात सेकंड डिग्री हत्येचा आरोप सिद्ध झाला आहे. मात्र, ओन्लीफॅन्स मॉडेलच्या वकिलांचा असा विश्वास आहे की हत्येचा कोणताही हेतू नव्हता.
अहवालानुसार, ओन्लीफॅन्स मॉडेलने तपासकर्त्यांना सांगितले की डेलने तिला विशेषत: एस्कॉर्ट किंवा स्ट्रिपर सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या वेबसाइटवर पाहिल्यानंतर प्रथम तिच्याशी संपर्क साधला. नंतर, मार्च आणि एप्रिल 2023 मध्ये मजकूर आणि फोन कॉल्समध्ये, डेलने रायलार्सडॅमला काही विचित्र गोष्टी सांगितल्या. ज्यात त्याने तिला ममी प्रमाणे सरीनच्या आवरणात लपेटून तिच्या पायात महिलांचे शूज चिकटवावे अशी विनंती केली. पोलिसांनी आरोप केला आहे की ओन्ली फॅन्स मॉडेल 17 एप्रिल 2023 रोजी पीडितेच्या घरी पोहोचली होती आणि त्यावेळी डेल मद्यधुंद अवस्थेत दिसला होता.
रायलार्सडॅमने काही तास डेलसोबत घालवण्याचा निर्णय घेतला आणि डेलच्या विनंतीनुसार फेटिस कृत्य करण्यास सुरुवात केली. सुमारे चार तासांनंतर, पोलिसांना एक कॉल आला आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना रायलार्सडॅम डेलवर सीपीआर करत असल्याचे आढळले. डेल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. काही दिवसांनी त्यांना लाइफ सपोर्ट काढून घेण्यात आला. गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचा अधिकाऱ्यांचा आरोप आहे. अहवालानुसार, त्याच्या मृत्यूचे कारण मेंदूतील ऑक्सिजनच्या कमतरतेशी संबंधित होते.