Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन महिलेला साखळदंडाने करकच्चून बांधून जंगलात सोडले, कनेक्शन तामिळनाडूशी; पोलिसांसमोर आव्हान काय?

सावंतवाडी रोणापाल-सोनुर्ले येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे.

अमेरिकन महिलेला साखळदंडाने करकच्चून बांधून जंगलात सोडले, कनेक्शन तामिळनाडूशी; पोलिसांसमोर आव्हान काय?
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 1:30 PM

सावंतवाडीच्या जंगलात एक अमेरिकन महिला आढळून आली होती. या महिलेला साखळदंडाने करकच्चून बांधून जंगलात सोडण्यात आले होते. पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून तिची लवकर सुटका झाली. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली आहे. तिच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व कृत्याला तिचा नवराच जबाबदार असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. तिचा नवरा तामिळनाडूत राहत असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तामिळनाडूत गेलं आहे.

ललिता कायी कुमार एस असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला साखळदंडाने बांधून सावंतवाडीच्या रोणापाल-सोनुर्ले जंगलात जंगली जनावरांसाठी सोडून देण्यात आलं होतं. शनिवारी ही महिला काही गुराख्यांना आढळून आली. त्यांनीच त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं आणि तिच्यावर उपचार सुरू केले. त्यानंतर या महिलेचा जबाब घेण्यात आला. तेव्हा तिच्या नवऱ्यानेच तिला जंगलात सोडल्याचं आढळून आलं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव सतीश आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तामिळनाडूत ललिता कायीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचलं. पण त्या ठिकाणी त्याचा शोध लागला नाही. मात्र पोलिसांनी या परिसरातील महिलांकडून आणि इतरांकडून या महिलेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच तिचा नवरा काय करतो? तो मूळचा कुठला आहे? त्याचे नातेवाईक किंवा मित्र या परिसरात राहतात का? याची माहिती पोलीस घेत आहे. सतीशला पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस गोवा आणि मुंबईलाही येऊन धडकले आहेत.

तेव्हाच माहिती उघड होईल

सतीशला अटक केल्यानंतर ललिताला जंगलात कधी सोडलं? तिला किती दिवसांपासून बांधून ठेवलं? तिला बांधून ठेवण्यामागचं कारण काय? या मागे कोण कोण आहे? तिला जीवे मारण्याचा कट होता का? त्यानेच तिला जंगलात सोडलं की आणखी कुणी? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांना त्याच्याकडूनच मिळणार आहेत. त्यामुळेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

योगा अभ्यासासाठी भारतात

पोलिसांना जेव्हा ही महिला सापडली तेव्हा ती भयंकर घाबरलेली होती. ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने पतीने मारहाण केल्याची आणि घातक तसेच चुकीची औषधे दिल्याचा आरोप केला आहे. खायला काहीच न मिळाल्याने ती अशक्त झाली होती. तिला उपचारासाठी गोव्यात नेण्यात आलं. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी सावंतवाडी आणि मदुराई रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. ही महिला योगा अभ्यासासाठी भारतात आली होती.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.