IND vs AUS Final | तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, वाद घालत मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं

भारताच्या पराभवामुळे फक्त क्रिकेट टीमचं नव्हे तर प्रत्येक चाहत्याचही मन मोडलं.काहींनी हा पराभव खिलाडूपणे स्वीकारून विजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या. पण काही लोकांना हा पराभव जिव्हारी लागला. या पराभवामुळे अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

IND vs AUS Final | तुम्ही मटण खाऊन आले म्हणून भारत हरला, वाद घालत मोठ्या भावाने लहान भावाला संपवलं
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 10:06 AM

अमरावती | 21 नोव्हेंबर 2023 : 19 नोव्हेंबरचा दिवस हा भारतीय क्रिकेट टीम आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशय वाईट आणि निराशाजनक होता. वर्ल्डकप 2023च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने टीम इंडियावर विजय मिळवला. भारताच्या पराभवामुळे फक्त क्रिकेट टीमचं नव्हे तर प्रत्येक चाहत्याचही मन मोडलं.काहींनी हा पराभव खिलाडूपणे स्वीकारून विजेत्या टीमला शुभेच्छा दिल्या. पण काही लोकांना हा पराभव जिव्हारी लागला. त्या नादातच काहींनी अशी कृती केली, ज्यामुळे सगळेच हादरले.

अशीच एक धक्कादाय घटना अमरावती मध्ये घडल्याचे उघड झाले. भारत पराभूत झाल्याने मोठ्या मुलाने त्याचे वडील आणि लहान भावावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंकित इंगोले याचा मृत्यू झाला, तर त्याच्याच वडिलांची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हादरवणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

नशेत वाद झाला आणि एका क्षणात नको ते घडलं

अमरावती जवळील अंजनगाव बारी गावात ही घटना घडली. अंकित इंगोले (28) असे मृत तरूणाचे नाव असून प्रवीण इंगोले (32) आरोपीचे नाव आहे. रमेश इंगोले असे त्यांच्या वडिलांचे नाव असून ते गंभीर जखमी आहेत.

रविवारी रात्री हे तिघेही घरात वर्ल्डकप बघत बसले होते, तेव्हा ते मद्यपानही करत होते. मात्र भारत हरला आणि मॅच संपली. क्रिकेट मॅच हरल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. तुम्ही मटण खाऊन आल्याने भारत हरला, असे सांगत नशेत असलेला आरोप प्रवीण याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल खेचून घेतला आणि तो त्याला मारला. यामुळे आरोपी संतापला आणि रागाच्या भराच त्याने घरातून लोखंडी सळी आणली आणि त्याचा भाऊ अंकित याच्यावर हल्ला केला. तसेच वडिलांनाही मारहाण केली.

या हल्ल्या अंकित गंभीर जखमी होऊ खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील रमेश हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भांदवि 302, 307 या कलमान्वये आरोपी प्रवीण याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.