Crime News : पतंग उडवत असताना चार वर्षीय चिमुकल्याचा तोल गेला, संपूर्ण गावावर शोककळा पसरली
मुलगा विहीरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. त्यामुळे काहीवेळी रस्त्यात ट्रॅफिक सुध्दा जाम झालं होतं.
अमरावती – जिल्ह्यात (Amravati Crime News) काल एक दुर्देवी घटना घडल्यामुळे सगळीकडे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात होती. वरुड (Varud) तालुक्यातील धनोडी गावात (Dhanodi) पतंग उडवत असताना चार वर्षाच्या चिमुकल्याचा तोल गेल्यामुळे तो विहीरीत पडला. त्यावेळी त्या परिसरात कोणीही नसल्यामुळे चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. चिमुकल्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली. त्यावेळी पोलिसांनी काही ग्रामस्थांच्या मदतीने चिमुकल्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला अशी माहिती मिळाली आहे.
शिव मानकर असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तो घराच्या माडीवरुन पतंग उडवत होता. त्यावेळी त्याचा पतंग लोखंडी ग्रीलला अडकला होता. तो काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट विहीरीत पडला. त्यावेळी त्या परिसरात कोणीचं नसल्यामुळे चिमुकला पडल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. त्यानंतर पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी मोटर पंपाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला.
मुलगा विहीरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर तिथं बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. त्यामुळे काहीवेळी रस्त्यात ट्रॅफिक सुध्दा जाम झालं होतं.