Missing | सर्वाधिक महिला बेपत्ता होणारा जिल्हा अमरावती, काय आहेत पाच कारणं?
संसाराचा गाडा हाकताने भांड्याला-भांडे हे लागणारच. पण दिवसेंदिवस पती-पत्नीमधील वाद हे विकोपाला पोहचत आहेत. लहान-मोठ्या कारणावरुन टोकाची भूमिका घेतली जात आहे. कारण क्षुल्लक पण निर्णय मोठा घेऊन संसार मोडल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून किंवा सतत होणाऱ्या वादाला वैतागूनही महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडलेले आहेत.
अमरावती : काळाच्या ओघात देश प्रगतीपथावर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय यंदा 75 वा स्वतंत्र अमृत महोत्सवही साजरा होत आहे. हे सर्व असले तरी आपली दुसरी बाजूही निरखणे तेवढेच आहे. (West Vidarbha) पश्चिम विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल 815 महिला (Woman Missing) ह्या बेपत्ता झाल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची कारणे वेगवेगळी असली तर या विभागातील (Amravati) अमरावती जिल्ह्यातून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये तरुण मुलींचाही समावेश आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम या 5 जिल्ह्यात 3 महिन्यात 815 महिला आणि तरुणी बेपत्ता असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- पतीसोबत भांडण संसाराचा गाडा हाकताने भांड्याला-भांडे हे लागणारच. पण दिवसेंदिवस पती-पत्नीमधील वाद हे विकोपाला पोहचत आहेत. लहान-मोठ्या कारणावरुन टोकाची भूमिका घेतली जात आहे. कारण क्षुल्लक पण निर्णय मोठा घेऊन संसार मोडल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून किंवा सतत होणाऱ्या वादाला वैतागूनही महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडलेले आहेत. यानंतर समुपदेशन आणि सल्ल्याने पुन्हा संसार हे जुळलेले देखील आहेत.
- प्रेमप्रकरणातून ठोकली धूम काळाच्या ओघात समाजव्यवस्थेमध्येही बदल होत आहे. तरुण-तरुणींच्या प्रेमात जर कुटुंबियांचा अडसर होत असेल तर थेट पळून जाण्याचा मार्ग स्विकारला जात आहे. त्यामुळेच महिलांपाठोपाठ तरुण मुलीदेखील घर सोडून जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
- फूस लावून पळून नेणे स्वप्नरंजक अशी आश्वासने देऊन तरुणी किंवा महिलांना पळून नेण्याच्या घटना देखील वाढत आहे. समाजव्यवस्थेचे चित्र बदलत असून अशा आश्वासनांपासून महिला आणि तरुणींनी कायम सावध राहणे गरजेचे आहे. फूस लावून पळून नेले तरी अशा महिलांचे परत येण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. यापैकी 50 टक्के महिला ह्या परत आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
- कुटुंबियांशी वाद महिलांनी पतीशी जुळवून घेतले तरी सासरच्या मंडळशी ते सहज शक्य होत नाही. त्यामुळे वेळोवेळी खटके हे उडतातच. याचे प्रमाण वाढत जाते आणि कौटुंबिक वादातूनही महिलांनी घर सोडल्याच्या घटना या पाच जिल्ह्यांमध्ये घडलेल्या आहेत. हे सर्व असले वादामुळे कुटुंभ विभक्त झाले तरी अशा प्रकरणातील 50 टक्के महिला ह्या परत येत आहेत.
- स्वतंत्र पथकाची आवश्यकता विविध कारणामुळे महिला आणि तरुणी ह्या बेपत्ता होत असल्या तरी अमरावती जिल्ह्यातून काही महिलांचा मानवी तस्करीसाठी सुद्धा उपयोग केला जात आहे. त्यामुळे अशा महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिस विभागाने स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी केली आहे. पोलीस यंत्रणेबरोबरच समुपदेशनही तेवढेच महत्वाचे आहे.
हे सुद्धा वाचा