अमरावती : अमरावती जिल्ह्यात आदिवासी महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या (Amravati Tribal Woman Gang Rape Case) नराधमांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. शिरखेड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निलेश मेश्राम, विनोद तुकाराम वानखडे, सुधीर रघुपती वानखडे, असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावं आहेत (Amravati Tribal Woman Gang Rape Case).
अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तळेगाव येथे 5 फेब्रुवारीला एका आदिवासी महिलेवर बलात्कार करुन तिच्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिरखेड पोलिसांनी जवळच्या विष्णोरा रहिवासी निलेश मेश्रामला अटक करण्यात आली होती.
आरोपी मेश्रामने पोलिसांना हत्येमध्ये सहभागी असल्याचे सांगितले होते. मात्र, क्राईम ब्रांचच्या जबाबात आरोपीने सांगितले की, मृत महिलेची हत्या तळेगाव येथील सुधीर रघुपती वानखडे (वय 26) तसेच विनोद तुकाराम वानखडे (वय 40) यांनी केली. जर मेश्रामने पोलिसांसमोर तोंड उघडल्यास त्याचीही हत्या करु, अशी धमकीही त्यांनी दिल्याने मोश्रामने खून केल्याची खोटी कबुली दिली, असे मेश्रामने पोलिसांना सांगितले होते.
शिरखेड पोलिसांनी आरोपी मेश्राम याच्या कबुली जबाबाला गंभीर घेत क्राईम ब्रांचच्या मदतीने दोन्ही आरोपींवर सीडीआर कॉलिंग आधारानुसार भांदविचे कलम 302, 376, 201 नुसार गुन्हा दाखल करुन दोघांनाही अटक केली.
या गुन्ह्याची कबुली देताना त्यांनी सांगितले की, दिनांक 1 फेब्रुवारीपासून मृत महिलेला रिद्धपूर निवासी एका प्रतिष्ठित सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या विटांच्या भट्ट्यावरुन उचलले होते (Amravati Tribal Woman Gang Rape Case).
चार दिवस या दोन्ही आरोपींनी तिला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र, महिलेने पोलिसांत जाऊन तक्रार करण्याची धमकी दिली. पोलिसांपासून बचावकरिता तिची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
पुरुषांना लग्नाच्या जाळ्यात अडकवून लुबाडणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश, पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरीhttps://t.co/FKh6owW3pS#PunePolice #Pune #PuneCrime #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
Amravati Tribal Woman Gang Rape Case
संबंधित बातम्या :
कुर्ल्यातील ड्रग्ज व्यापाऱ्याला लग्नमंडपातच अटक; एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला ‘सिंगल’च ठेवलं
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा
प्लास्टिकच्या बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह, अॅसिड टाकून जाळण्याचाही प्रयत्न, कोल्हापुरात खळबळ