Nagpur Gang Rape: 300 रुपयात बलात्कार! नागपुरात 11 वर्षाच्या मुलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार

परिचयाच्या व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केल्यानंतर या मुलीला धमकावले. याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील आरोपीने दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला 300 रुपये देखील दिले. हे पैसे मी दिलेत असे तुझ्या घरच्यांना सांगू नकोस. हे पैसे मला सापडले आहेत असे सांग. अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देखील असे आरोपीने सांगीतले. यानंतर नऊ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे आई-वडील मजूर आहेत.

Nagpur Gang Rape: 300 रुपयात बलात्कार! नागपुरात 11 वर्षाच्या मुलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार
डेटिंग अॅपवरुन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढायचा, मग एकांतात बोलवून अत्याचार करायचाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 6:41 PM

नागपूर : महाराष्ट्र पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला आहे. 11 वर्षाच्या मुलीवर 9 नराधमांनी तब्बल महिनाभर आळीपाळीने केला बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये(Nagpur Gang Rape) घडली आहे. आरोपींनी बलात्कार करण्यासाठी पीडित मुलीला मोबदल म्हणून 300 रुपये दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. जिथे ही घटना घडली ते एक खेडेगाव असून नागपूर शहरापासून 60 किमी अंतरावर आहे. घटना उघडकीस येताच ग्रामस्थ आक्रमक झाले. यांनतर पोलिसांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरु केला. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

परिचयाच्या व्यक्तीनेच केला बलात्कार

नागपूर जिल्ह्यातील उमरेडजवळील एका गावात बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. या 11 वर्षीय शाळकरी मुलीवर गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केला. या व्यक्तीने खोटे बोलून या मुलीला त्याच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच याविषयी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांनी देखील या मुलीवर अत्याचार केला.

बलात्कारानंतर 300 रुपये दिले

परिचयाच्या व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केल्यानंतर या मुलीला धमकावले. याविषयी कोणाला सांगितले तर जीवे मारु अशी धमकी देखील आरोपीने दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला 300 रुपये देखील दिले. हे पैसे मी दिलेत असे तुझ्या घरच्यांना सांगू नकोस. हे पैसे मला सापडले आहेत असे सांग. अजून काही लोक येणार आहेत. त्यांनाही असेच करु दे ते देखील तुला पैसे देखील असे आरोपीने सांगीतले. यानंतर नऊ नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडितेचे आई-वडील मजूर आहेत.

घटना उघडकीस येताच गावात खळबळ उडाली

घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे गावातील मुली आणि महिलांमध्ये दहशत पसरली आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींना अटक केली.

या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा हत्येच्या गुन्हात सहभाग

रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ ​​करण रिठे (22) नितेश फुकट (30), प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ ​​पिंकू नरुळे (24) अशी आरोपींची नावे आहेत. या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. रोशन करगावकर हा एका हत्या प्रकराणातील आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अत्याचाराची कबुली दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश होता याविषय पोलिस अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.