पुण्यात शतपावली करणाऱ्या 85 वर्षांच्या वृद्धेला फरफटत नेत अत्याचार, विकृत नराधमाला अटक

पुण्यातील गुन्हेगारी वाढतच चालली आहे. एका इमारतीत फ्लॅटसमोरील पॅसेजमध्ये शतपावली करणाऱ्या एका वृद्धेवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात शतपावली करणाऱ्या 85 वर्षांच्या वृद्धेला फरफटत नेत अत्याचार, विकृत नराधमाला अटक
crime scene news
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 1:44 PM

समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पिंपरी- चिंचवड परिसरात वाढत्या शहरीकरणाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. येथील एका  23 वर्षीय तरुणाने एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेच्या वैद्यकीय अहवालातून वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला लागलीच अटक केली आहे.

पिंपरी- चिंचवड परिसरात  एका 23 वर्षीय नराधमाने 85 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीसा आला आहे. या गंभीर घटने प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी ओम जयचंद पुरी याला अटक केली आहे. मेडिकल रिपोर्टमधून वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याचं स्पष्ट झाल्याची अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली आहे.

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी ओम जयचंद पुरी हा एका सोसायटीत गेला होता. पाचव्या मजल्यावर फ्लॅटच्या समोरच शतपावली करत असलेल्या महिलेचे त्याने तोंड दाबून फरफटत तिला सहाव्या मजल्याच्या पॅसेजमध्ये नेले. तिथं त्याने त्या महिलेवर अत्याचार केला. महिलेला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्नही त्याने केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. पीडित महिला घरात न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध केला तेव्हा त्या जखमी अवस्थेत आढळल्या. पीडित वृद्ध महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या तासात आरोपीला अटक केली आहे. विकृत आणि संतापजनक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी हा त्याच सोसायटीमध्ये इलेक्ट्रीशियनचे काम गेल्या काही महिन्यांपासून काम करत होता. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.