धक्कादायक! पाणी समजून पाजलं डिझेल; चार वर्षाच्या बहिणीच्या निरागसतेमुळे आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू
अचानक बाळ रडायला लागले. भावाला रडताना पाहून बहिणीने शेजारी पडलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यातील पाणी बाळाला पाजले. मात्र, या बाटलीत पाणी नाही तर डिझेल भरले होते हे या मुलीला समजलेच नाही.
दिल्ली : लहान मुलांचे प्रेम किती निरागस असतं हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, चार वर्षाच्या मुलीच्या याच निरागसतेमुळे तिच्या आठ महिन्यांच्या लहान भावाचा मृत्यू(Death) झाला आहे. या बहिणीने आपल्या भावाला पाणी समजून डिझेल(Disel) पाजलं. यातच या बाळाचा मृत्यू झाला. नोएडातील सेक्टर 63 परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. नोएडा(Noida) येथील छिजारसी गावात ही भावंड राहतात आहे. पीडितेचे कुटुंब मूळचे हरदोई येथील आहे. विशेष म्हणजे घरातील सर्व सदस्य घरी उपस्थित असताना ही घटना घडली आहे. घरातील सर्व सदस्य आपल्या कामात व्यस्त होते. यावेळी ही दोघं लहान भावंड खेळत होती.
पाण्याच्या बाटलीत डिझेल भरले होते हे मुलीला समजले नाही
अचानक बाळ रडायला लागले. भावाला रडताना पाहून बहिणीने शेजारी पडलेली पाण्याची बाटली उचलली आणि त्यातील पाणी बाळाला पाजले. मात्र, या बाटलीत पाणी नाही तर डिझेल भरले होते हे या मुलीला समजलेच नाही.
बाळाचा आवाज ऐकून घरातील सर्व सदस्य मुलांकडे धावत आले
डिझेल प्यायलानंतर बाळ जोरजोरात रडायला लागले. बाळाचा आवाज ऐकून घरातील सर्व सदस्य मुलांकडे धावत आले. यावेळी मुलीने बाळाला पाण्याऐवजी डिझेल दिल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी तात्काळ बाळला रुग्णालयात दाखल केले. शरीरात डिझेल गेल्याने बाळाला त्रास झाला. तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.