Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत मोहटा देवी देवस्थानच्या पुजाऱ्यासह कर्मचाऱ्याचाही मृत्यू
पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी देवस्थानाचे पुजारी म्हणून राजूदेवा मुळे हे गेल्या अनेक वर्षापासून सेवा करीत होते. रविवारीही ते मंदिरातील काम आटोपून कर्माचारी कैलास शिंदे यांच्या बरोबर निघाले होते. दरम्यान पाथर्डीतील आय.टी.आय जवळ ते आले असता त्यांना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. मात्र, रात्र असल्याने काही लक्षात येण्याआगोदच चारचाकी वाहनधारक हे पसार झाले.
अहमदनगर : भरधावात असलेल्या (Four Wheeler) चारचाकी वाहनाने जोराची (Accident) धडक दिल्याने पाथर्डी तालुक्यातील (Mohta Devi) मोहटा देवी देवस्थानच्या पुजाऱ्यासह एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पाथर्डीतील आयटीआय इमारतीच्या जवळच घडली आहे. निर्मनुष्य रस्ते असताना ही घटना घडल्याने नेमके कोणत्या वाहनाच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालेले नाही. देवस्थानचे मुख्य पुजारी विवेक उर्फ राजूदेवा मुळे आणि कर्मचारी कैलास शिंदे यांचा दुर्देवी या घटनेत मृत्यू झाला आहे.
अज्ञात चारचाकी वाहनाने दिली धडक
पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी देवस्थानाचे पुजारी म्हणून राजूदेवा मुळे हे गेल्या अनेक वर्षापासून सेवा करीत होते. रविवारीही ते मंदिरातील काम आटोपून कर्माचारी कैलास शिंदे यांच्या बरोबर निघाले होते. दरम्यान पाथर्डीतील आय.टी.आय जवळ ते आले असता त्यांना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. मात्र, रात्र असल्याने काही लक्षात येण्याआगोदच चारचाकी वाहनधारक हे पसार झाले. यामध्ये मात्र, देवस्थानचे पुजारी आणि कर्मचारी यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
देवस्थानचे मुख्य पुजारी होते मुळे
पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवीला जिल्हाभरातून भाविक हे दर्शनासाठी येत असात. शिवाय राजूदेवा मुळे हे गेल्या अनेक वर्षापासून मंदिराचे पूजारी म्हणून काम पाहत होते. रोजच्या प्रमाणे ते कर्माचारी कैलास शिंदे यांच्याबरोबर निघाले होते. मात्र, अर्ध्या वाटेत असतानाच वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये दोघांचीही जागीच मृत्यू झाला आहे.शिवाय यमुना भाबड अपघातात जखमी झाला आहे.
आय.टी.आयच्या इमारतीजवळ अपघात
मोहटा देवी देवस्थान हे पाथर्डी तालुक्यात असले तरी मुख्य पुजारी विवेक उर्फ राजूदेवा मुळे व कर्मचारी कैलास शिंदे घराकडे निघाले होते. दरम्यान, हे दोघेही आय टी आय इमारतीच्या जवळ आले असता चारचाकी वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.