ब्रेकअप झाल्याने तो स्मशानात जाऊन करायचा हे काम, अखेर धक्कादायक घडले

प्रेमातील अपयश न पचल्याने एका तरुणाला स्मशानात जाण्याचा छंदच लागला होता. त्याने तेथे जाऊन विविध विधी केले होते. अखेर या प्रकरणाचा विचित्र वळण लागले...

ब्रेकअप झाल्याने तो स्मशानात जाऊन करायचा हे काम, अखेर धक्कादायक घडले
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 3:22 PM

प्रेमात माणूस आंधळा होतो असे म्हटले जाते, त्याला काही दिसत नाही. जात, धर्म, श्रीमंती – गरीबी काही दिसत नाही असे म्हटले जाते. असाच एक प्रकार विचित्र प्रकार घडला आहे. परंतू प्रेमाने नाकारल्याने हा विचित्र प्रकार घडला आहे. एका तरुणाचे एका तरुणीशी प्रेम सुरु होते, परंतू तिने अचानक त्याला भेटणे बंद केल्या या तरुणाची अवस्था बिकट झाली आणि हा तरुण रात्री अपरात्री स्मशानात जाऊन बसू लागला, या प्रकाराने त्याच्या घरातील लोक प्रचंड घाबरले. अखेर या प्रकरणात धक्कादायक घडले…

प्रेमात नकार मिळाल्याने एक इव्हेंट मॅनेजर निराश झाला आणि त्याने अचानक स्मशानात जाऊन बसू लागला. त्याच्या अशा वागण्याने त्याच्या घरातील लोक आणि मित्रमंडळी प्रचंड घाबरली. त्याला एका तांत्रिकाचा नाद लागला होता असा संशय त्यांना आला. परंतू या तांत्रिकापासून त्याची सुटका करण्यात यश आले नाही. अखरे या ब्रेकमध्ये या तरुणाने अत्यंत टोकाचे पाऊल उचलेले.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील इव्हेंट मॅनेजर समर प्रताप सिंह याचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. त्यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. अखेर त्याला एका तांत्रिकाकडे जाण्याचा मार्ग कोणीतरी सांगितला. या तांत्रिकाच्या नादाला लागून तो स्मशानात जाऊन विविध काळ्या जादू सारखे विधी करु लागला. या विधीतून आपले प्रेम परत मिळेल अशी आशा त्याला होती. परंतू झाले विपरीत. या तांत्रिकाला त्याने भरपूर पैसा दिला. परंतू त्यातून काहीही फायदा झाला नाही. त्यातून त्याने अखेर जीवन संपवले. त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहीली नव्हती.

व्हॉट्सवरुन तांत्रिकाचा शोध लागला.

समर याच्या मोबाईल चॅटचा पोलिसांनी शोध घेतला तेव्हा त्याने तांत्रिकाला शेवटचा संदेश पाठविल्याचे उघड झाले. तांत्रिकाला त्याने लिहीले होते की तुम्ही माझ्या समस्या सोडवू शकला नाहीत.आता मला मरण्याशिवाय काही पर्याय नाही. पोलिसांनी या प्रकरणात अशोका गार्डनर येथे राहणारा मांत्रिक आशुतोष याला अटक केलेली असल्याचे अतिरिक्त उपायुक्त रश्मी अग्रवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.