ती आईची वाट बघत होती, पण आता तिला न्यायची वाट बघावी लागणार, शेजाऱ्यानेच केलं धक्कादायक कृत्य
नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संशयित आरोपीवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.
नाशिक : नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार ( Nashik Crime News ) केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीवरच शेजारच्या तरुणाने घर बघण्याच्या बहाण्याने लैंगिग अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक शहर पोलीस ( Nashik Police ) आयुक्तालयाच्या हद्दीतील देवळाली कॅम्प परिसरात ही घटना घडल्याने त्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
देवळाली कॅम्प परिसरात घडलेल्या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी हा घराशेजारीच राहणारा असल्याची बाब समोर आली आहे.
आई आणि मुलगी दोघेच राहतात. तुमचं घर मला बघायचे आहे असा बहाणा करून संशयित आरोपी प्रितम पाटील याने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर पीडित मुलीशी बोलत असतांना त्याने हात पकडला आणि अत्याचार करण्यास सुरुवात केली.
खरंतर मुलीने यावेळी संशयित आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो सोडण्यास तयार नव्हता. खरंतर मुलगी घराच्या बाहेर दरवाजात उभी राहून आपल्या आईची वाट पाहत असतांनाच हा प्रकार घडला होता.
मुलीने आरडा ओरड करून आपली सुटका केली त्यानंतर काही वेळातच आई आल्यानंतर संपूर्ण हकीकत संगीतली. त्यानंतर शेजाऱ्यांना विचारपूस केली मात्र त्यानंतर पीडित मुलीसह आईवरच प्रश्न केले गेले.
त्यानंतर संतापलेल्या आईने आपल्या अल्पवयीन मुलीला घेऊन थेट देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि फिर्याद देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर देवळाली कॅम्प पोलीसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास केला जात आहे.
नाशिक शहरात ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून शेजाऱ्याच्या व्यक्तीकडून सुरक्षित नसल्याची घटना समोर आली असून उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.