नाशिक शहर हादरलं ! बहिणीला छेडण्याचं कारण विचारायला गेला, त्याने बहीण भावावर…

टवाळखोरांच्या हल्ल्यात भाऊ आणि बहीण दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिक शहर हादरलं ! बहिणीला छेडण्याचं कारण विचारायला गेला, त्याने बहीण भावावर...
अनैतिक संबंधातून पतीने पत्नीला संपवलेImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 10:01 AM

नाशिक : नाशिक शहरामध्ये टवाळखोरांना कायद्याचा किंवा पोलिसांचा ( Nashik Police ) धाक राहिला नाही का? असा संतप्त सवाल नाशिकमध्ये ( Nashik Crime ) विचारला जात आहे. याचं कारण म्हणजे नाशिकच्या अंबड परिसरात बहीण आणि भावावर टवाळखोरांनी धारधार शस्राने हल्ला केला आहे. क्लासवरुन बहीण घराच्या दिशेने येत असतांना रस्त्यातच तीची काही तरुणांनी अश्लील हावभाव करत छेड काढली. बहीण प्रीती भुजबळ हिने आपला भाऊ उमेश भुजबळ याला याबाबत सर्व माहिती दिली. भावाने बहिणीला सोबत घेऊन जात जिथे हा प्रकार घडला तिथेच असलेल्या टवाळखोरांना जाब विचारला. मात्र, जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ आणि बहीणीवर थेट कोयत्यानेच हल्ला करण्यात आला आहे.

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुरकुले हॉल याठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जाब विचारायला गेलेल्या बहीण भावावर टवाळखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहे.

बहिणीची छेड काढली म्हणून भावाने टवाळखोरांना गाठले होते. टवाळखोर यांना माझ्या बहिणीची छेड कुणी काढली असा जाब विचारताच जवळ असलेला कोयता काढला आणि वार सुरू केले.

हे सुद्धा वाचा

जवळच असलेली बहीणही भावावर वार सुरू झाल्याचे पाहून घाबरली. त्यावेळी तीने टवाळखोरांना अडवून भावाला वाचविण्याचा प्रयत्न करत केला मात्र, टवाळखोरांनी तिच्यावर सुद्धा हल्ला केला.

टवाळखोरांच्या हल्ल्यात भाऊ आणि बहीण दोघेही गंभीर जखमी झाले आहे. दोघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.

जखमी बहीण आणि भावाने टवाळखोरांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात जखमी बहीण आणि भावाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या सिडको परिसरात घडलेल्या या घटणेनंतर संपूर्ण शहर हादरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना यानिमित्ताने निर्माण झाली आहे. सर्रासपणे टवाळखोरांकडे धारधार शस्र आढळून येत आहे.

नाशिक शहरात विविध ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतांना टवाळखोरांकडे कोयता, पिस्तूल यांसह धारधार शस्र आढळून येत असल्याने नागरिकांकडून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

नाशिक शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे गुन्हेगारीवर अंकुश कधी ठेवणार अशी चर्चा नाशिक शहरात दबक्या आवाजात होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या काळातील पोलिसांच्या भूमिकेवर संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.