काचेच्या ग्लासात दिवाळीला फटाका फोडण्याचा मोह त्याला आवरता आला नाही, पुढे जे घडलं ते कुणासोबतही घडू नये

याप्रकरणी झरीफनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. धीरेंद्र असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

काचेच्या ग्लासात दिवाळीला फटाका फोडण्याचा मोह त्याला आवरता आला नाही, पुढे जे घडलं ते कुणासोबतही घडू नये
काचेच्या ग्लासात फटाके फोडताना अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 9:01 PM

बदायू : दिवाळी हा प्रकाशाचा, आतषबाजीचा सण आहे. या सणाला फटाके फोडण्याचा मोह लहानांपासून मोठ्यांना कुणालाच आवरत नाही. मात्र काही लोकांना फटाके फोडताना (Bursting crackers) खोडसाळपणा करण्याची सवय असते. यामुळेच कधी कधी ते संकट ओढवून घेतात. अशीच एक उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) उघडकीस आली आहे. फटाके फोडताना घडलेल्या घटनेत एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा (Man Death) लागल्याची घटना उत्तर प्रदेशातील बदायूमध्ये घडली आहे.

काचेच्या ग्लासमध्ये फटाके फोडले

बदायूमधील झरीफनगर पोलीस ठाण्याअंतर्गत मोरुबाला गावात एका काचेच्या ग्लासात फटाके फोडले. फटाक्याचा स्फोट होताच ग्लास फुटला आणि काचेचा एक तुकडा रस्त्याने जाणाऱ्या वाटसरुच्या गळ्याला लागला. यात सदर इसम गंभीर जखमी झाला.

घटनेत व्यक्ती गंभीर जखमी

गळ्याला काचेचा तुकडा लागल्याने त्या व्यक्तीच्या गळ्यातून रक्त येऊ लागले आणि ते खाली पडले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अलिगढ वैद्यकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. छत्रपाल असे वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. छत्रपाल जखमी झालेले पाहताच आरोपीने तेथून पळ काढला.

आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

याप्रकरणी झरीफनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. धीरेंद्र असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी छत्रपालचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध गेत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.